रेकॉर्डब्रेक ! सोनं प्रति तोळा 38670 तर चांदी 45000 प्रति किलो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत सराफ बाजारात शनिवारपासून दोन्ही महागड्या धातूंनी उचल खालली आहे. सोन्याच्या भावात २५० रुपयांनी वाढ होऊन आता हे भाव ३८६७० रुपये प्रति १० ग्राम झाले आहे. चांदी देखील चकाकली असून चांदीच्या भावात ३७० रुपयांनी वाढ झाली असून बाजारातील चांदीची किंमत ४५,०५० रुपये प्रति किलोग्राम आहे. यामुळे सामान्यांना सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यासाठी अधिक बचत करावी लागणार आहे.

विदेशी भावांचा विचार करता सोने स्टॅडर्ड २५० रुपयांनी वधारुन ३८,६७० रुपये प्रति १० ग्राम झाले आहे. १२ ऑगस्टला सोने ३८४७० रुपयांने सराफ बाजारात विकेल जात होते.

चांदीचे भाव देखील वधारले असून मागणी देखील वाढली आहे. यामुळे चांंदीचे भावात ३७० रुपयांनी वाढ झाली असून किंमत ४५,०५० रुपयांवर गेली आहे. काल चांदीचे भावात चांगली वाढ झाली होती. त्यानंतर चांदी ४३,८२४ रुपये किलोग्रामने विकली गेली.

आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या व्यापारिक तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ होता आहे. अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत उतार चढाव येत आहेत. याचा परिणाम देशातील सराफ बाजारावर होतं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like