सोने 600 तर चांदी 1000 रुपयांनी महाग, जाणून घ्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – सोने चांदीच्या भावात तेजीत वाढ होताना सोन्याच्या आणि चांदीच्या भावाने अचानक उसळी घेतल्याचे पहायला मिळाले. शनिवारी सोन्याच्या भावात ६०० रुपये प्रति तोळा तर  चांदी एकाच दिवसात एक हजार रुपये प्रति किलोने वाढली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव ३८ हजार ६०० रुपयांवर पोहोचले असून चांदीदेखील ४५ हजारांवर पोहोचली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या – चांदीच्या भावात तेजी सुरु आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे तसेच अमेरिका व चीनने सोन्याची खरेदी वाढविल्याने, ही भाव वाढ सुरु आहे.

शनिवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची काही अंशी सुधारणा असली, तरी  सोने ६०० रुपये प्रति तोळा तर चांदी एक हजार रुपये प्रति किलोने वाढली आहे. विदेशात सोन्या -चांदीची वाढलेली खरेदी व निघणारे वाढीव भाव, यामुळे भारतातही या धातूंचे भाव वाढत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –