खुशखबर ! मोदी सरकारकडून घरबसल्या 1100 रूपये स्वस्त दरानं सोनं खरेदीची संधी, मिळणार ‘हे’ 3 फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किमतींमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे केंद्र सरकारने नवीन योजना आणली असून यामध्ये तुम्हाला स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी आहे. 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान सरकार या सोने खरेदीची संधी देत असून यामध्ये तुम्हाला बाजारभावाच्या 1100 रुपये कमी किमतीने सोने मिळणार आहे. सध्या सोन्याचे दर हे 40 हजाराच्या वर गेले आहेत. त्यामुळे तुम्हाला या योजनेंतर्गत 38,900 रुपये प्रतितोळा सोने खरेदी करण्याची संधी आहे. Sovereign Gold Bond या योजनेंतर्गत तुम्हाला हे सोने खरेदी करण्याची संधी आहे. त्याचबरोबर तुम्हाला यावर व्याज देखील मिळणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन खरेदीवर तुम्हाला प्रतिग्रॅम 50 रुपयांची सुटदेखील मिळणार आहे.

काय आहे ही योजना
या योजनेची सुरुवात नोव्हेंबर 2015 मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी बॉण्डच्या रूपात सोने खरेदी करण्याला ग्राहकांनी पसंती द्यावी म्हणून सरकारने हि योजना आणली होती. त्यामुळे तुमची आयकरात देखील बचत होते.

कुठे खरेदी करणार सोने
Sovereign Gold Bond ची विक्री बँकांमध्ये स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तसेच पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात येत आहे. याठिकाणी जाऊन तुम्ही हे बॉण्ड खरेदी करू शकता.

यावर मिळणार 50 रुपये सूट
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही ऑनलाईन या बॉंडची खरेदी केल्यास तुम्हाला प्रत्येक ग्रॅमवर 50 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेत तुम्हाला 3,890 रुपये प्रति ग्रॅमऐवजी 3,840 रुपये प्रतिग्रॅम दराने सोने खरेदी करता येणार आहे.

Sovereign Gold Bondचे फायदे

1) जास्त फायदा मिळणार
या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला यावर 2.5 टक्के व्याजदर देखील मिळणार आहे.

2)मोठी बचत होणार
बॉण्डच्या रूपात सोने खरेदी केल्याने त्याची किंमत बाजारातील सोन्यावर अवलंबून असते. त्यामुळे सरकारने यासाठी जास्त कालावधीचे गोल्ड बॉण्ड बाजारात आणायचे ठरवले आहेत. यामध्ये तुम्ही 8 वर्षासाठी गुंतवणूक करू शकता. मात्र तुम्ही यामध्ये केवळ 5 वर्षानंतरच पैसे काढू शकता.

3) कर्ज काढू शकता
गरज पडल्यास तुम्हाला या सोन्यावर कर्ज देखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक फार फायद्याची आहे.