पैसे कमवण्याची ‘सुवर्ण’संधी, सोन्याचा ‘दर’ लवकरच 40000 च्या पुढे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका-चीनच्या व्यापार युद्धामुळे भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव वाढले असून नागरिक सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यानंतर आता जगभरातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. सध्या सोन्याचा भाव प्रतितोळा ३८ हजार रुपयांच्या पुढे गेला असून यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला देखील मंदी आली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

आणखी वाढणार किंमत
सोन्याच्या भाववाढीविषयी बोलताना केडिया कमोडिटीचे अजय केडिया म्हणाले कि, या किमती कमी होण्याची सध्या कोणतीही लक्षणे दिसत नसून लवकरच सोने ४१ हजाराच्या पार जाईल.

या कारणांमुळे वाढतोय भाव
१) सुरक्षित गुंतवणूक म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करत आहेत.
२) जगात राजकीय संकट गडद झाल्याने आणि अनिश्चितता असल्यामुळे.
३) शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड होत असल्याने सोन्याचे भाव सतत वाढत आहेत.
४) जगातील अनेक देशांच्या सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असल्याने.

सोन्यात गुंतवणूक सगळ्यात सुरक्षित
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित असून यामध्ये उत्तम परतावा देखील मिळतो. जर तुम्ही जानेवारीत सोने खरेदी केले असेल तर तुम्हाला आता त्याचा १० टक्के इतका परतावा मिळाला असता. बँकेत एफडी आणि म्युच्युअल फंडापेक्षाही जास्त परतावा सोन्यामध्ये मिळत असल्याने नागरिक जास्त प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करतात.

बॉंडमध्ये गुंतवणूक फायदेशीर
सध्या नागरिकांचा कल ईटीएफ किंवा बाँडरूपी सोनं खरेदी करण्याकडे वाढला आहे. यामुळे सोने सुरक्षित देखील राहते. यासाठी सरकारने गोल्ड बाॅण्ड स्कीम देखील आणली आहे.

या स्कीमचे फायदे
१) या स्कीममध्ये तुम्ही थेट सोने खरेदी करण्यापेक्षा साॅवरेन बाॅण्डमध्ये पैसे गुंतवू शकता. यामुळे तुम्ही सुरक्षित देखील राहता.
२) या बॉंडची विक्री हि, बँकांमध्ये, त्याचबरोबर स्टाॅक होल्डिंग काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये होणार आहे.

या बॉंडपेपरचा मिळणार हा फायदा
१) ऑनलाईन पेमेंटवर सूट –
हे बॉंड खरेदी करताना तुम्ही डिजिटल पेमेंट केले तर तुम्हाला प्रतिग्रॅम ५० रुपये सूट दिली जाणार आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेचा सल्ला देखील घेण्यात आला आहे.

२) मिळणार अडीच टक्के व्याज – या बॉंडपेपर्सवर तुम्हाला इनिशियल इन्व्हेस्टमेंटवर अडीच टक्के व्याजदर मिळणार आहेत.

३) मिळणार कर्ज – गोल्ड बॉंडपेपरवर तुम्हाला कर्ज देखील मिळू शकते. पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटप्रमाणे देखील याचा वापर करता येतो.

आरोग्यविषयक वृत्त