सोनं पुन्हा स्वस्त तर चांदी महागली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली सराफ बाजारात शनिवारी सोने 150 रुपयांनी स्वस्त होऊन 39,270 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदी 300 रुपयांनी महागली. यामुळे चांदी 46,750 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

जागतिक बाजारात सोन्याच्या कमी होणाऱ्या किंमतीचा प्रभाव स्थानिक सराफ बाजारात दिसला. लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये सोने 1,504.60 डॉलर प्रति औंस झाले तर अमेरिकेत सोन्याच्या बाजारात 3.5 डॉलरने घसरण होऊन 1,510.30 डॉलर प्रति औंस झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 0.04 डॉलरने स्वस्त होऊन 17.53 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

स्थानिक बाजारात शुक्रवारी 1,150 रुपयांनी वाढल्यानंतर आज सोने स्टॅंडर्ड 150 रुपयांनी कमी होऊन 39,270 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, चांदी देखील 300 रुपयांनी महागली आणि 46,750 रुपये प्रति किलोग्रॅम झाले. चांदी वायदा बाजारात 129 रुपयांनी वाढून 45,530 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

सोन्याचे भाव कमी होत असल्याने लोकांकडून खरेदी वाढली आहे. सणानिमित्त लोकांचा सोने खरेदीकडे कल वाढत आहे. सध्या सोन्याचे भाव कमी होत असल्याने सोने खरेदी करु इच्छिणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आज दोन्ही किंमती धातूंचे भाव असे होते –

सोने स्टँडर्ड प्रति 10 ग्रॅम – 39,270 रुपये

सोने बिटुर प्रति 10 ग्रॅम – 39,150 रुपये

चांदी हाजिर प्रति किलोग्रॅम – 46,750 रुपये

चांदी वायदा प्रति किलोग्रॅम – 45,530 रुपये

शिक्के लिलावी – 920 रुपये

शिक्के बिकवाली – 930 रुपये

गिन्नी प्रति आठ ग्रॅम – 30,200 रुपये

visit : Policenama.com