मार्च महिन्यात सोनं 50 हजारांचा टप्पा गाठणार ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढच्या महिन्यात सोन्याची चमक परत येईल का? यावर एका प्रसिद्ध बिझिनेस वाहिनीने एक सर्वेक्षण केले. वेगवेगळ्या दलालांनी यावर आपले मत दिले आहे. जवळपास सर्व तज्ज्ञांनी असे सांगितले की, येणाऱ्या काळात सोने निश्चितच मोठा टप्पा गाठेल. सोन्याची चमक सध्या किंचितशी कमी झाली आहे. पण, मार्च महिना सोन्यासाठी कसा असेल?, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

शुक्रवारी सराफा बाजारातही काहीशी तेजी दिसून आली. सोन्याच्या किंमतीत २०० रुपयांनी घट झालेली दिसली. एमसीएक्समध्ये सोन्याचे दर ४६,००० रुपयांच्या खाली घसरले. तर, एमसीएक्सवर चांदी १२०० रुपयांनी घसरून ६८,००० च्या जवळ आली आहे. शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केट दोन्ही एकाचवेळी कोसळत आहेत, हे फार क्वचितच घडते आहे, परंतु शुक्रवारी बाजारात हेच दृश्य दिसून आले.

मार्चमध्ये सोन्याची किंमत काय असेल ?
ब्रोकर – लक्ष्य (₹ / १० ग्राम)

– मोतीलाल ओसवाल : ₹ ५०,०००/-

– पॅराडाईम कमोडिटी : ₹ ४९,०००/-

– अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज : ₹ ४९,०००/-

– आनंद राठी : ₹ ४९,०००/-

– एसएमसी कॉमट्रेड : ₹ ४९,०००/-

– एंजल कमोडिटी : ₹ ४८,०००/-

– चॉइस ब्रोकिंग : ₹ ४८,०००/-

– कोटक सिक्युरिटीज : ₹ ४७,०००/-

– ट्रस्टलाईन : ₹ ४७,०००/-

– पृथ्वी फिनमार्ट : ₹ ४७,०००/-

(Gold Price Outlook Gold price will reach Rs 50,000 in March)

सोन्याच्या दराबद्दल तज्ज्ञांशी विशेष संवाद साधला. जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल म्हणाले, की पुढच्या महिन्यात सोन्याची किंमत ५०००० रुपयांपर्यंत पोहोचेल. ते म्हणाले की, अमेरिकेच्या रिफॉर्म धोरणामुळे यावर थोडासा दबाव आहे. पण, येणाऱ्या काळात सोने पुन्हा सावरेल, अशी अपेक्षा आहे. लोकांना सोनं खरेदी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आणि ते म्हणाले की, आता सोने खरेदी केल्यास फायदा होईल. तसेच मोतीलाल ओसवालच्या नवनीत दमानी म्हणाल्या, की सोने पुन्हा एकदा चमकेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुपया देखील मजबूत होत आहे, त्यामुळे सोन्याची चमक लवकरच वाढेल, अशी अपेक्षा आहे. ते म्हणाले की, जरी सोने शॉर्ट टर्ममध्ये घसरळे असले, तरी लाँग टर्ममध्ये त्याची किंमत ५०००० ते ५१००० हजारांवर जाईल. सोन्यावर सध्या दबाव पाहायला मिळत आहे. त्यांनी स्टॉप लॉस 46250 ठेवा आणि 45800चे टार्गेट ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, दागिने खरेदी केवळ भारतातच नव्हे, तर चीनमध्येही वाढेल. मार्चच्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ होईल, असे जवळजवळ सर्व तज्ज्ञांनी सांगितले. असे आनंद राठीचे जिगर त्रिवेदी म्हणाले.