सोने चांदींच्या ‘किंमती’त उतरण, जाणून घ्या आजचा ‘सोन्या’चा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमती रोजच वाढत होत्या परंतू आज सोन्याचा दरात घसरणं झाली आहे. आज सोने जवळपास १४० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याच्या सततच्या वाढणाऱ्या किंमतीला आज ब्रेक लागला आहे. दिल्लीच्या बाजार सोने १४० रुपयांनी स्वस्त झाले. आज १४० रुपयांने सोने स्वस्त झाल्यानंतर आता सोन्याच्या किंमती ३८,४७० रुपये प्रति १० ग्राम आहेत.

तर चांदीचे दर देखील कमी झाले असून त्याच्या किंमतीत २९० रुपयांची उतरणं झाली आहे. आज चांदी ४४,०१० रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या व्यापारिक तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ होता आहे. अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत उतार चढाव येत आहेत. याचा परिणाम देशातील सराफ बाजारावर होतं आहे.

गुरुवारी सोने ५५० रुपयांने वाढल्यानंतर सोन्याच्या किंमती ३८,४७० रुपये प्रति १० ग्राम झाल्या होत्या. हा देशातील विक्रमी दर समजला जात होता. याशिवाय चांदी देखील चांगलीच तळपली असून चांदीचे भाव ६३० रुपयांनी वधारले होते. यामुळे चांदी ४४,००० रुपयांपासून ४४,३०० रुपयांपर्यंत प्रति किलोग्राम झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त