गेल्या 6 महिन्यात सोनं तब्बल 10 हजारांनी वाढलं, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जानेवारीपासून सुरु झालेल्या सोन्याच्या किंमतीतली तेजी अद्यापही सुरुच आहे. देशांतर्गत सराफा बाजारात यावीर्षी 10 ग्रॅम सोन्याचे दर 50 हजारापर्यंत पोहचले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरस महामारीपासून अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी अमेरिकेसह जगातील सेंट्रल बँक मदत पॅकेजची घोषणा करू शकते. अशा परिस्थितीत अमेरिकन डॉलर कमकुवत होईल. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढतील.

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आणि गेल्या काही वर्षात झालेल्या सोन्याच्या दरातील आताची ही वाढ उच्चांकी आहे. 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 4 हजार 782 तर 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 4902 हजार आहे. आज मुंबईत 22 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 49 हजार 020 तर 24 कॅरेट एका तोळ्याची किंमत 48 हजार 520 रुपये आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला एक तोळा सोन्याचे दर 39 हजार रुपये होता. जो आतापर्यंत 49 हजार 500 च्या विक्रमी पातळीवर पोहचला आहे. वायदा बाजारात सध्या सोन्याचे दर 49 हजारांच्या पातळीवर आहे. यावर्षी आतापर्यंत 25 टक्क्यांनी सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

सहा महिन्यात वाढले सोन्याच दर
जानेवारी – प्रति तोळा 39 हजार 200 रुपये
फेब्रुवारी – प्रति तोळा 40 हजार 240 रुपये
मार्च – प्रति तोळा 40 हजार 200 रुपये
एप्रिल – प्रति तोळा 41 हजार 670 रुपये
मे – प्रति तोळा 47 हजार 600 रुपये
जून – प्रति तोळा 48 हजार 410 रुपये
जुलै – प्रति तोळा 49 हजार रुपये