Gold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Price Today ) सतत घसरण होत आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार (Good returns website) मंगळवारी २२ कॅरेट सोन्याचे भाव ४७,७६० रुपयांवरून घसरून ४७,७३० रुपये प्रति ग्रॅम झाले. त्याचबरोबर आज चांदीचा भाव ७१,९०० रुपये प्रतिकिलो होता. आठवड्याच्या दुसर्‍याच दिवशी देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. यापूर्वी सोमवारीसुद्धा सोन्या-चांदीच्या (Gold silver Price) भावात घट झाली होती. मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशीही या मौल्यवान धातूंच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

सोनं झालं स्वस्त ८,००० रुपयांनी

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने ५६,२००० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते.
या दराच्या तुलनेत सोनं आजही ८,००० हजार रुपयांनी स्वस्त दरात मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय दराच्या तुलनेत सोने आणि चांदीचे भाव आज भारतीय बाजारामध्ये गडगडले.
एमसीएक्सवर तिसर्‍या दिवशी सोन्याचे दर (Gold Price Today) घसरून ४८,४९३ रुपयांवर आले, तर चांदी ०.८ टक्के घसरून ७१,३०१ रुपये प्रति किलो वर आली.
मागील सत्रात सोन्याच्या दरात ०.८ टक्क्यांनी तर चांदी ०.५६ टक्क्यांनी घसरली होती.
या महिन्याच्या सुरूवातील सोनं पाच महिन्यातील उच्चांकी ४९,७०० या दराने मिळत होते.
मात्र, त्यानंतर दरांमध्ये सातत्याने घसरण नोंदवली गेली आहे.

कोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

जाणून घ्या मोठ्या शहरांमधील सोन्याचे भाव

गुड रिटर्ननुसार (Good returns), नवी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,६५० रुपये आहे. चेन्नईमध्ये ती ४५,७५० रुपयांवर आली आहे.
त्याचबरोबर मुंबईतील २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७६० / १० ग्रॅम आहे.
चांदीच्या दरात ४०० रुपयांनी घट झाली असून सध्याचा दर ७२,३०० रुपये प्रति किलो झाला आहे.
गेल्या आर्थिक दिवसात हा दर ७१,९०० रुपये एवढा होता.

जागतिक सोन्याचा भाव

ब्लूमबर्ग वेबसाईटनुसार (Bloomberg website), सोमवार संध्याकाळी कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव ०.९८ टक्क्यांनी किंवा १८.५० डॉलरच्या मोठ्या घसरणीनंतर १८६१.१० डॉलर प्रति औंसवर लटकल्याचा दिसत होता.
तर सोन्याचा वैश्विक भाव सध्या १.०२ टक्के किंवा १९.१२ डॉलरवरून घसरून १८५८.४१ डॉलर प्रति औंस वर आल्याचे दिसून आले.

Web Title : gold price today | 15 june rate down 8000 rupees from record high

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

LIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार नाही पैशांची चणचण