Gold Price Today : जाणून घ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीचे सोन्याचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आठवड्याच्या पहिल्याच दिवसात आज (सोमवार) सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झालेली दिसून आली. शुक्रवारी सोन्याचा दर दहा ग्रॅम 50 हजार 547 रुपये होता. आज 5 रुपयांच्या किंचित वाढीसह दर प्रति 10 ग्रॅम 50 हजार 552 रुपये झाला आहे. दरम्यान सुरुवातीच्या व्यापारात सोन्याची घसरण सुरु झाली. केवळ दहा मिनिटांत व्यापारात सोन्याचे दर 10 ग्रॅम 50 हजार 437 रुपये झाले.

कमकुवत मागणीमुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्या ठेवी कमी केल्यानंतर शुक्रवारी वायदा बाजारात सोन्याचे भाव 0.090 टक्क्यांनी घसरून किंमत 50665 झाली. तर मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबर मधील सोन्याचे वायदे 47 रुपये म्हणजे 0.09 टक्क्यांनी घसरून 50665 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.10 टक्क्यांनी वधारुन ते 1910.90 डॉलर प्रति औंस झाले.

येत्या काळात सोन्याच्या किंमती वाढणार ?
कोरोना महामारीमुळे शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. जगभरातील बहुतेक स्टॉक मार्केट्स कोरोनामुळे पडझडीमुळे सावरत आहेत. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात चढ-उतार पहायला मिळत आहे. आता प्रश्न उद्भवतो की सोने देखील कोरोनापूर्व काळात परत येईल की नाही. कारण ट्रेड असे दिसून आले आहे की जर शेअर बाजार मजबूत असेल तर सोनं अजूनही स्वस्त होईल. जानेवारीत सेन्सेक्स 41 हजारांच्या जवळ होता, तेव्हा सोन्याची किंमतही 41 हजारांच्या जवळ होत्या.

सोन्याच्या आयातीत घट
पहिल्या सहामाहीत देशात 15.8 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 1 लाख 10 हजार 259 कोटी रुपयांची सोन्याची आयात झाली होती. यावर्षी एप्रिल-सप्टेंबरदरम्यान, चांदीची आयातही कमी झाली होती. आयात आणि निर्यातीत जे अंतर असतं, त्यालाच Current Account Deficit (CAD) म्हणतात. एप्रिल-सप्टेंबरमध्ये CAD मध्ये घट होऊन तो 24.33 अब्ज डॉलरवर आला. जो यापूर्वी याच काळात 88.92 अब्ज डॉलर होता.

दरवर्षी भारतात किती सोन्याची आयात होते
जगभरात जितके देश सोन्याची आया करतात, त्या मोठ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारत वर्षभरात जवळपास 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. ज्वेलरी इंडस्ट्रीची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक सोन्याची आयात केली जाते. करेंट फिस्कल ईयरच्या पहिल्या सहामाहीत रत्न आणि ज्वेलरीची निर्यात 55 टक्के घसरून 8.7 अब्ज डॉलर होती.