Gold Price Today | आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात कमालीची घसरण, जाणून घ्या किती झाले स्वस्त

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Gold Price Today | तुम्ही सुद्धा लग्नसराईत सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण सोन्यासह चांदीच्या दरात सुद्धा यावेळी जोरदार घसरण दिसून येत आहे. आज पुन्हा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.18 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहे. तर चांदीच्या किमतीत (Silver) सुद्धा घसरण दिसून येत आहे. (Gold Price Today)

येथे जाणून घ्या किती स्वस्त झाले सोने-चांदी

आज MCX फेब्रुवारी डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत 0.18 टक्के घसरणीसह 47,751 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर आहे. तर आजच्या व्यवहारात चांदी 0.41 टक्के घटसह 61,581 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरवर ट्रेड करत आहे.

8,449 रुपये स्वस्त मिळत आहे सोने

2020 बाबत बोलायचे तर मागील वर्षी समान कालावधीत एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपयांच्या उच्च स्तरावर पोहचला होता. आज सोने ऑगस्ट वायदा एमसीएक्सवर 47,751 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे, म्हणजे अजूनही सुमारे 8,449 रुपये स्वस्त मिळत आहे. (Gold Price Today)

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

Web Title : Gold Price Today | 22 carat and 24 carat gold sliver price today down check price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

 

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात