Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर सोने- चांदीच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि. 22) बाजार सुरु होताच तेजी पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा एप्रिलचा फ्यूचर ट्रेड 123 रुपयांच्या तेजीसह 46,320 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. त्याशिवाय चांदीचा मार्चचा फ्यूचर ट्रेड 394 रुपयांच्या वाढीसह 69,406 रुपये प्रति किलोवर व्यवसाय करत आहे.

सोन्याचा दरात गेल्या आठवड्यात 1100 रुपये म्हणजेच 2.3 टक्क्यांची घसरण झाली होती. शुक्रवारी MCX वर वायदा सोन 46,190 प्रति 10 ग्रॅमवर होते. गेल्या वर्षातील रेकॉर्ड लेवल 56,200 च्या तुलनेत गोल्ड रेटमध्ये आतापर्यंत 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात जवळपास 4000 रुपयांची घसरण झाली आहे.

राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 45 हजार 420 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 450 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीचा भाव 69 हजार रुपये प्रति किलो दर होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने दरात तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेत सोन्याचा दर 1,784.54 डॉलर प्रति औंसवर बंद झाला आहे. दरम्यान सोने-चांदी खरेदी करण्यासाठी हाच काळ चांगला ठरू शकतो,असे जाणकारांचे मत आहे.