पुन्हा घसरल्या सोन्या-चांदीच्या किंमती , जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. मंगळवारीही सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रचंड घसरण झाली. आज सोन्याच्या किंमतीत प्रति 100 ग्रॅम 1,200 रुपयांंची घसरण झाल्याचे दिसून आले, म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 120 रुपयांपर्यंत. कमकुवत जागतिक निर्देशांदरम्यान भारतात सलग दुसर्‍या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवर सोन्याचे वायदा दर 10 ग्रॅम 0.24 टक्क्यांनी घसरून 44,795 वर, तर चांदी 0.5% खाली घसरून 66,013 प्रती किलो झाली. मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर 0.18% तर चांदी 1.6% खाली घसरली.

सोन्याच्या किंमती –
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचे सोन्याचे भाव प्रति 100 ग्रॅम 4,38,000 रुपये आणि प्रति 10 ग्रॅम 43,800 रुपये आहेत. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 100 ग्रॅम 4,47,950 रुपये आणि प्रति 10 ग्रॅम 44,795 रुपये आहे. सोमवारी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 302 रुपयांची घट झाली होती.

नवीन चांदीच्या किंमती –
चांदीच्या किंमतींमध्येही मंगळवारी किंचित घट नोंदविली गेली. सराफा बाजारात चांदीचा दर आज 66,013 रुपये प्रतिकिलोवर आला. सोमवारी चांदीच्या किंमती 1.6 टक्क्यांनी घसरल्या.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या – चांदीचे दर:
स्पॉट गोल्ड 0.3% घसरून 1,733.69 डॉलर प्रति औंसवर आला. अन्य मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.6% टक्क्यांनी घसरून 25.61डॉलर आणि प्लॅटिनम 0.3 % ने खाली घसरून 1,179.59 डॉलरवर बंद झाली.

आतापर्यंत 11500 रुपयांनी स्वस्त झाले सोने –
गेल्या काही महिन्यांत सोने 10,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोरोना संकटात ते 55 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून सोन्याच्या किंमती सतत खाली आल्या आहेत. लसीकरणानंतर आर्थिक क्रियेत वेग वाढण्याची अपेक्षा आहे.

का झाली सोन्यात घसरण-
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार या आठवड्यात अमेरिकन बाँडच्या लिलावावर व्यापारी आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत भारतीय बाजारात सोन्याच्या भावांवर दबाव आहे. त्याचबरोबर, आज व्यापाराच्या सुरूवातीच्या काळात मजबूत डॉलर आणि यूएस बाँडच्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी देखील विक्री केली. सोन्याच्या किंमतीदेखील या दबावाखाली आल्या.