Gold Price Today | 9000 रुपयांपेक्षा सुद्धा जास्त स्वस्त मिळतंय सोनं, जाणून घ्या 10 ग्रॅमचा लेटेस्ट भाव

नवी दिल्ली (New Delhi) : Gold Price Today |  सोने खरेदी (Gold Price) करणार्‍यांसाठी खुशखबर आहे. एमसीएक्स मार्केटमध्ये आज सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) घसरण दिसून आली आहे. MCX वर ऑगस्ट सोने वायदा 46518 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर आहे. तर, चांदीत (Silver) तेजी दिसून आली आहे. चांदी (Silver) 0.16 टक्केच्या वाढीसह 68381 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. जर सोन्याच्या ऑल टाइम हाय रेट (56254 रुपये प्रति 10 ग्रॅम) सोबत लेटेस्ट रेटची तुलना केली तर सोने (Gold) अजूनही 9175 रुपये स्वस्त आहे.

याशिवाय इंटरनॅशनल मार्केटबाबत (International Market) बोलायचे तर येथे सुद्धा सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. सोन्याचे दर (Gold Rate) कमी होऊन 1,763.63 डॉलर प्रति औंसवर आले आहेत जी चार वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर

गुड्स रिटर्न वेबसाइटनुसार, 30 जून 2021 ला 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Rate) सर्व
शहरांमध्ये वेगवेगळा आहे. देशाची राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Rate)
50080 रुपये आहे. याशिवाय चेन्नईत 48100 रुपये, कोलकातामध्ये 49120 रुपये, मुंबईत
46900 रुपये, हैद्राबादमध्ये 47730 रुपये, जयपुरमध्ये 50080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

इंडिया बुलियन मार्केटने केले ट्विट

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट (ibjarates.com) नुसार, शुद्ध सोन्याचा
(999) भाव 4701 रुपये, 22 कॅरेट 4541 रुपये, 18 कॅरेटचा भाव 3761 रुपये रुपये प्रति 1 ग्रॅम
आहे. IBJA द्वारे जारी करण्यात आलेले रेट देशभरात सर्वमान्य आहेत. मात्र, या वेबसाइटवर देण्यात आलेल्या रेटमध्ये जीएसटीचा (GST) समावेश करण्यात आलेला नाही.

हे देखील वाचा

Burglary in Pune | पुण्यातील टिंबर मार्केट, बुधवार पेठ, सॅलिसबरी पार्क, विमाननगर आणि वारजे माळवाडी परिसरात घरफोडया, लाखोंचा ऐवज लंपास

Smartphone | तुमच्या Smartphone वर हॅकर्सचा ‘वॉच’, ‘या’ 4 टिप्स वापरून आपला डाटा करा सुरक्षित; जाणून घ्या

Builder Amit Lunkad | बिल्डर अमित लुंकडच्या माणसांनी धमकावल्याची लेखी तक्रार पुणे पोलिसांकडे; प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : gold price today 30 june 2021 more then 9k rupees down today check silver rates today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update