Gold Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीच्या किमतीत सुद्धा घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर

नवी दिल्ली : Gold Price Today | डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात सोने (Gold Price Today) 302 रुपये स्वस्त झाले. राष्ट्रीय राजधानीत सोने बुधवारी 302 रुपयांच्या घसरणीसह 46,848 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मागील व्यवहारात सोने 47,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. एचडीएफसी सिक्युरिटजने ही माहिती दिली.

 

चांदीच्या दरात 81 रुपयांची घसरण

तर, चांदीची किंमत (Silver Price Today) सुद्धा 81 रुपयांच्या घसरणीसह 61,031 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. मागील व्यवहारात चांदीचा दर 61,112 रुपये प्रति किलोग्रॅमवर होता.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title : check gold silver latest price in india 1 december 2021 check today 10 gram gold price 22 carat gold price 24 carat gold rate in your city

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा