Gold Price Today | सोने आज 242 रुपयांनी महागले, चांदीच्या दरात 543 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात तेजीचे सत्र जारी आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोने (Gold Price Today) 242 रुपयांनी महाग झाले. राष्ट्रीय राजधानीत सोने सोमवारी 242 रुपयांच्या तेजीसह 47,242 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली.

 

चांदीच्या किंमतीत 543 रुपयांची तेजी

 

तर, सोन्याच्या दरात वाढ होण्यासह चांदीच्या किमतीत सुद्धा (Silver Price Today) सोमवारी 543 रुपयांची तेजी आली.
यानंतर दिल्लीत चांदी 62,248 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. चांदी मागील व्यवहाराच्या सत्रात 61,705 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

 

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

 

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या.
पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते.
विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते.
यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे पोहोचल्या पानपट्टीवर अन्… (व्हिडीओ)

Omicron Variant | नवीन कोविड व्हेरिएंट Omicron चे पहिले छायाचित्र जारी Delta पेक्षा जास्त म्यूटेशन

Winter session 2021 | राज्यसभेत गोंधळ घालणार्‍या 12 खासदारांचं निलंबन; काँग्रेससह शिवसेनेच्या दोघांचा समावेश