Gold Price Today | महाग झाले सोने, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा नवीन दर

नवी दिल्ली : Gold Price Today | सोन्याच्या किमतीत बुधवारी तेजी दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात 8 डिसेंबरला सोन्याचे दर तेजीसह बंद झाले. आज सोन्याच्या दरात 177 रुपयांची तेजी दिसून आली. तर, चांदीच्या किंमतीत 1,112 रुपये प्रति किलोग्रॅमची घसरण झाली. (Gold Price Today)

 

राष्ट्रीय राजधानीत सोने 177 रुपयांनी वाढून 47,267 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर, चांदी 1,112 रुपयांच्या घसरणीसह 60,533 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. यामुळे मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 47,090 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते आणि चांदी 61,645 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- check gold silver latest price in india 8 december 2021 check today 10 gram gold price 22 carat gold price 24 carat gold rate in your city

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा