Gold Price Today | सोन्याच्या किमतीत 764 रुपयांची घसरण तर चांदीही झाली 1592 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

0
128
Gold Rate Today gold silver price on 18 august 2022
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. राजधानी दिल्लीत आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 764 रुपयांनी घसरून 52,347 रुपयांवर आला. मागील व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा भाव 53,111 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भाव आज 1,592 रुपयांनी घसरून 58,277 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात तो 59,869 रुपयांच्या पातळीवर होता. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही. (Gold Price Today)

 

स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी सराफा बाजार बंद होता. त्याआधी शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजने सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड प्राईस घसरून1,775 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होती. त्याच वेळी चांदीचा भाव 20.13 डॉलर प्रति औंसवर होता. दुसरीकडे, देशांतर्गत स्टॉकमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सेन्सेक्स जवळपास 380 अंकांनी वाढून 59,842 वर बंद झाला आणि निफ्टी आज 127 अंकांनी वाढून 17,825 वर बंद झाला. (Gold Price Today)

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर
सोन्याचा दर तुम्ही घरबसल्या सहज जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.

अशा प्रकारे तपासू शकता सोन्याची शुद्धता
सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ’BIS Care app’द्वारे ग्राहक (Consumer) सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) तपासू शकतात. या अ‍ॅप (App) द्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रार करू शकता. या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवल्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.

 

Web Title :- Gold Price Today | decreased by 764 rupees and silver down by 1592 rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Monsoon Session | उद्धव ठाकरेंची खेळी ! पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाच्या आमदारांना व्हिप जारी

 

Bank Jobs 2022 | बँकांमध्ये 6000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती, लवकर करा अर्ज; ‘ही’ आहे शेवटची तारीख

 

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाचा पोर्टफोलिओवर परिणाम, खुले होताच कोसळले ‘हे’ स्टॉक्स