Gold Futures Price : सोन्याच्या देशांतर्गत आणि जागतिक किंमती घसरल्या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुक्रवारी देशातील वायदा बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या. 5 ऑगस्ट 2020 रोजी शुक्रवारी सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनी एमसीएक्स एक्सचेंजवरील सोन्याचा वायदा भाव 75 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 47,866 रुपयांवर ट्रेंड करत होता. त्याशिवाय 5 ऑक्टोबर 2020 रोजी सोन्याचे वायदा भाव शुक्रवारी सकाळी एमसीएक्सवर 0.12 टक्के किंवा 57 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 48,049 रुपयांवर ट्रेंड करत होता. जागतिक पातळीवर शुक्रवारी सकाळी सोन्याच्या स्पॉट आणि वायदा या दोन्ही किंमती खाली आल्या आहेत.

सोन्याबरोबरच चांदीच्या देशांतर्गत वायदा किंमतीही शुक्रवारी सकाळी घसरल्या. 3 जुलै रोजी एमसीएक्सवरील चांदीचा वायदा भाव शुक्रवारी सकाळी 0.04 टक्क्यांनी किंवा 21 रुपयांनी घसरून 48,095 रुपये प्रति किलोग्रॅम वर ट्रेंड करत होता. त्याचबरोबर, 4 सप्टेंबर 2020 रोजी चांदीचा वायदा भाव शुक्रवारी सकाळी 145 रुपयांनी घसरून 48,942 रुपये प्रति किलोग्रॅम वर ट्रेंड करत होता.

जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमती जाणून घेऊया. ब्लूमबर्गच्या मते शुक्रवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा भाव 0.02 टक्क्यांनी किंवा 0.40 डॉलर च्या घसरणीसह प्रति औंस 1,770.20 डॉलर वर ट्रेंड करत होता. त्याच वेळी सोन्याची जागतिक पातळीवरील स्पॉट किंमत 0.16 टक्क्यांनी किंवा 2.90 डॉलरच्या घसरणीसह प्रति औंस 1,760.89 डॉलरवर ट्रेंड करत होती.

चांदीच्या जागतिक भावाबद्दल बघितले तर ब्लूमबर्गच्या मते शुक्रवारी सकाळी कॉमेक्सवर चांदीचा जागतिक वायदा भाव 0.01 टक्क्यांच्या घसरणीसह प्रति औंस 18.05 डॉलर वर ट्रेंड करत होता. तसेच, चांदीची जागतिक स्पॉट किंमत 0.33 टक्क्यांनी किंवा 0.06 डॉलरच्या घसरणीसह प्रति औंस 17.74 डॉलरवर ट्रेंड करत होती.