Gold Price Today : घसरले सोन्याचे दर, चांदीच्या किंमतीमध्ये वाढ; चेक करा लेटेस्ट भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सोन्याच्या किमतीमध्ये आज घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीए) वर जून वायदा सोन्याच्या भाव 0.29 टक्केच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. तर, चांदी हलक्या वाढीसह व्यवहार करत आहे. मे वायदा चांदीच्या भावात 0.45 टक्केची तेजी दिसून आली. एमसीएक्सवर मे वायदा चांदीची किंमत 225 रुपयांच्या मजबूतीसह 68,635 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

ग्लोबल मार्केटमध्ये अमेरिकन कोषागरातील उत्पन्नातील मंदीदरम्यान सोन्याच्या दरात घसरण नोंदली गेली. मागील सत्रात हाजिर सोने 0.2 टक्के घसरून 1,766.32 डॉलर प्रति औंसवर होते. ब्रोकरेजने म्हटले की, 1725 डॉलरच्या खालील घसरणीत मंदीचे संकेत असू शकतात.

सोन्याचे दर

मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून वायदा सोन्याचा भाव 139 रुपयांच्या घसरणीसह 47,254 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील सत्रात सोने 47,850 रुपयांच्या उंचीवर पोहचले होते.

24 कॅरेट गोल्डचा भाव

गुड्सरिटर्ननुसार, 24 कॅरेट गोल्डच्या भावाबाबत बोलायचे तर राजधानी दिल्लीत 10 ग्रॅमची किंमत 50,630 रुपये आहे. याशिवाय चेन्नईत 49040 रुपये, मुंबईत 46080 रुपये, कोलकातामध्ये 49610 रुपये, हैद्राबादमध्ये 48610 रुपये आणि बेंगलोरमध्ये 48610 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत आहे.

22 कॅरेट गोल्डचा भाव

जर 22 कॅरेट गोल्डबाबत बोलायचे तर आज राजधानी दिल्लीत 10 ग्रॅमचा दर 46410 रुपये आहे. याशिवाय चेन्नईत 44960 रुपये, मुंबईत 45080 रुपये, कोलकातामध्ये 46910 रुपये, बेंगलोरमध्ये 44150 रुपये आणि हैद्राबादमध्ये सुद्धा 44150 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे.

कोरोना संकटात गुंतवणुकदारांनी केली सोन्यात गुंतवणूक

कोरोना काळात गुंतवणुकदारांनी सोन्यात मोठी खरेदी केली आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सोन्याची आयात 22.58 टक्के वाढून 34.6 अरब डॉलर किंवा 2.54 लाख कोटी रुपयांवर पोहचली. आकड्यांनुसार, आर्थिक वर्षादरम्यान चांदीची आयात 71 टक्के कमी होऊन 79.1 कोटी डॉलर राहिली.