Gold Price Today : सोने खरेदीचा करताय विचार ? तर आत्ताच करा खरेदी; दरात मोठी घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. कधी तेजी तर कधी घसरण, असेच गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतर आता सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX)सोन्याचा एप्रिल फ्युचर ट्रेड 7 रुपयांनी कमी होऊन 46,795 रुपयांवर पोहोचला आहे.

सध्या चांदीच्या फ्युचर ट्रेड 129 रुपयांच्या तेजीसह 69,470 रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहिला मिळाली आहे. अमेरिकेत सोन्याचा बाजार 1.88 डॉलरच्या तेजीसह 1,808 डॉलर प्रतिऔंसच्या दरावर गेला होता. तर चांदीच्या बाजारात हे दर 0.01 डॉलरच्या घसरणीसह 27.70 डॉलरच्या स्तरावर पोहोचला होता.

दिल्लीत आजचा सोन्याचा दर काय?
– 22 कॅरेट सोन्याचा दर – 46,010 रुपये प्रतिदहा ग्रॅम
– 24 कॅरेट सोन्याचा दर – 50,190 रुपये प्रतिदहा ग्रॅम
– चांदीचा दर – 70,510 रुपये प्रतिकिलो

पुण्यात सोने-चांदीचा दर काय?
– 22 कॅरेट सोन्याचा दर – 45,950 रुपये प्रतिदहा ग्रॅम
– 24 कॅरेट सोन्याचा दर – 46,950 रुपये प्रतिदहा ग्रॅम
– चांदीचा दर – प्रतिकिलो 75,700 रुपये

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण
गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आत्तापर्यंत सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांनी कपात झाली आहे. अद्यापही सोन्याची दरातील घसरण सुरुच आहे.