Gold Price Today | घरात असेल लग्नकार्य तर ताबडतोब खरेदी करा सोने, 10841 रुपयांनी मिळत आहे स्वस्त, पहा 10 ग्रॅमचे दर

नवी दिल्ली : Gold Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारातील (international market) कमजोरीमुळे भारतीय सराफा बाजारात सुद्धा आठवड्याच्या दुसर्‍या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे 29 जून 2021 ला सोन्याच्या भावात (Gold Price Today) घसरण नोंदली गेली आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price Today) सुद्धा आज कमी झाली आहे. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,256 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 68,148 रुपये प्रति कि.ग्रा. वर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) सोन्याच्या दरात आज घसरण नोंदली गेली, तर चांदीच्या किंमतीत जास्त बदल झाला नाही.

सोन्याचा नवा भाव (Gold Price, 29 June 2021) –
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात 89 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट नोंदली गेली. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवीन भाव आता 46,167 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) सोन्याच्या किंमती आज घसरून 1,774 डॉलर प्रति औंसवर पोहचल्या आहेत.

विक्रमी उच्चपासून आहे 10841 रुपये स्वस्त –
दिल्ली सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020 ला सोन्याची किंमत 57,008 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या
विक्रमी उच्च स्तरावर बंद झाली होती. या आधारावर सोने (Gold) सध्या आपल्या सर्वोच्च
स्तरापासून 10,841 रुपये स्वस्त मिळत आहे. अशावेळी जर तुमच्या घरात लग्नकार्य असेल तर
ताबडतोब सोने (Gold) खरेदी करू शकता.

चांदीचा नवीन भाव (Silver Price, 29 June 2021) –
चांदीच्या किंमतीत सुद्धा आज घसरणीचा कल होता. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीत
222 रुपयांची घट झाल्यानंतर 67,926 रुपये प्रति कि ग्रॅमवर बंद झाली. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात
(international market) चांदीच्या दरात जास्त बदल झाला नाही आणि ती 26.02 डॉलर प्रति
औंसवर पोहचली.

हे देखील वाचा

Fake Vaccine | काय आहे फेक कोरोना लसीकरण, कसं ओळखाल की कोणतं सेंटर बोगस आहेः जाणून घ्या

Chitra Wagh | भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाल्या – ‘महाविकास आघाडीत किती आलबेल हे तुमच्या येरझाऱ्यांवरुनच दिसतयं’

Pune News | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागात पाणी येणार नाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : gold price today | down gold more then 10800 rupees down from peak 29 june 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update