Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today । मागील काही महिन्यापासून सातत्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) चढउतार होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसामध्ये सोन्याच्या दरात (Gold Price) वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र आज (मंगळवारी) सोन्याच्या दरात घसरण झाली असल्याचं पाहायला मिळाला आहे. तसेच चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) नुसार सोन्याच्या वायदे भावात 0.19 टक्क्यांनी कमी होऊन सोन्याचा दर 47,495 रुपये इतका झाला आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 62,798 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सध्या सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. मागील वर्षी सोन्याची किंमत (Gold Price) पन्नास हजारच्या (50 thousand) पुढे होती. मात्र यंदा त्याची किंमत 50 हजाराच्या आत आहे. या पार्श्वभूमीवर ग्लोबल मार्केटबाबत बोलायचे झाले तर याठिकाणी आज सोनं स्वस्त झाल्याचं स्पष्ट होत आहे. या दरम्यान, ग्राहकाला सोन्याचांदीचे दर जाणून (Gold-Silver Price) घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. काही वेळात मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या दराबाबत मेसेज येईल. याव्यतिरिक्त सोन्याच्या दराबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

काय आहे 24 कॅरेट सोन्याचा दर?

मुंबई :
24 कॅरेट सोन्याचा दर – 47270 रुपये

दिल्ली :
24 कॅरेट सोन्याचा दर – 50630 रुपये

चेन्नई :
24 कॅरेट सोन्याचा दर – 48670 रुपये

कोलकाता :
24 कॅरेट सोन्याचा दर – 49410 रुपये

 

Web Title : gold price today down on mcx and silver drop today on multi commodity exchange 24 august 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LIC Special Revival Campaign | बंद पडलेली LIC पॉलिसी पुन्हा करू शकता सुरू, जाणून घ्या कोणत्या अटींचे करावे लागेल पालन

Pune Corporation | पुणे महापालिकेतील अधिकारी अन् कर्मचार्‍यांचा 7 वा वेतन आयोग अंतिम मान्यतेसाठी रखडला; जाणून घ्या कारण

Pune Corona | नीती आयोगाकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा, तज्ज्ञांनी पुणेकरांना दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला, जाणून घ्या