Gold Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत आज जबदरस्त घसरण, खरेदीपूर्वी पहा नवीन भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 9 ऑगस्ट 2021 ला सोन्याच्या भावात (Gold Price Today) जबरदस्त घसरणीचा कल राहिला. यामुळे सोने आज 45 हजाराच्या जवळ पोहचले. तर, चांदीच्या किमतीत (Silver) सुद्धा आज ताबडतोब घसरण नोंदली गेली. यामुळे चांदी 63 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली पोहचली.

मागील व्यवहाराच्या सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने 45,708 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 63,700 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोने-चांदीच्या दरात घसरणीचा कल होता.

सोन्याचा नवीन भाव
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या भावात 317 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट नोंदली गेली. यामुळे सोने 45 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहचले. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 45,391 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज कमी होऊन 1,749 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

चांदीचा नवीन भाव
चांदीच्या किंमतीत आज जबरदस्त घसरण दिसून आली.
यामुळे चांदी 63 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली गेली.
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचे दर 1,128 रुपयांच्या घसरणीसह 62,572 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाले.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात सुद्धा घसरणीचा कल होता आणि ती 23.91 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

सोने-चांदीत का झाली घसरण

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की,
अमेरिकन जॉब मार्केटच्या रिपोर्टमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त उसळी नोंदली गेल्याने गुंतवणुकदारांनी सोन्याची जोरदार विक्री केली.

याशिवाय डॉलर इंडेक्समध्ये मजबूती आल्याने सोन्याची मागणी घटली.
यामुळे सोन्याच्या किंमतीत सतत घट नोंदली जात आहे.

Web Title :- gold price today drop down to rupees 45391 per 10 gram and silver also fell drastically to rupees 62572 investment return

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | घरफोडी करुन गावाकडं थाटला संसार, 7 वर्षांनी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

PM Modi | पंतप्रधान मोदींनी UNSC मध्ये सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी जगाला सांगितली 5 तत्त्वे; जाणून घ्या

Weight Loss with Owa | ‘या’ जबरदस्त ड्रिंकमुळे काही आठवड्यातच कमी होईल वजन, गायब होईल चरबी