Gold Price Today | सोन्याच्या दरात 2000 रूपयांपेक्षा जास्तीने ‘घसरण’, चांदी झाली 5739 नं ‘स्वस्त’; जाणून घ्या पुढं कसा राहिल ट्रेंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात गोल्ड सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय (Safest Investment Option) मानला जातो. म्हणूनच, कोरोना संकटात सुद्धा गुंतवणुकदारांनी सोन्यात जोरदार खरेदी केली. यातून सोन्याच्या भावाला (Gold Price Today) समर्थन मिळाले आणि ते ऑगस्ट 2020 मध्ये आपल्या ऑल-टाइम हाय झाले. मात्र, जसजशी कोरोनाविरूद्धची लढाई वाढत गेली सोन्याच्या दरात (Gold Price Today) उलथा-पालथ वाढत गेली.

1 जून 2021 च्या तुलनेत किंमत
यानंतर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा एकदा अस्थायी तेजी दिसून आली. पुन्हा व्हॅक्सीनेशन (Corona Vaccination) मध्ये आलेल्या तेजीमुळे यामध्ये घसरणीचा कल दिसून आला. परिणामी, सोन्याच्या किमती 1 जून 2021 च्या तुलनेत यावेळी 2000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 5,739 रुपये प्रति किग्रॅ स्वस्त आहे.

सोन्याची किंमत दिल्ली सराफा बाजारात 1 जून 2021 ला 48,892 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. तर, चांदी 71,850 रुपये प्रति किग्रॅवर पोहचून बंद झाली होती. या तुलनेत 23 जुलै 2021 म्हणजे मागील शुक्रवारी दिल्ली सराफा बाजाररत सोन्याची किंमत 46,698 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचे दर 66,111 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाले.

या आधारावर पाहिले तर सोन्याचे दर मागील 2 महिन्यापेक्षा सुद्धा कमी वेळात 2,194 रुपये प्रति 10 ग्रॅमवर लटकले आहेत.
तर, चांदीच्या दरात 5,739 रुपयांची घसरण नोंदली गेली आहे.

 

खुप मोठी उसळी नाही

बुलियन मार्केटच्या एक्सपर्टचे म्हणणे आहे की,
महागाई (Inflation) मुळे पुढील काही आठवड्यात सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू राहील.
मात्र, यामध्ये खुप मोठी उसळी येणार नाही. तरीसुद्धा ऑगस्ट 2021मध्ये या किमती धातुच्या किंमतीत तेजीचा कल पहायला मिळू शकतो.
आणि तो 48,500 रुपयांवर पोहचू शकतो.

मोठ्या कालावधीत किती मिळू शकतो नफा
तसेच, मोठ्या कालावधीसाठी गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांनी अगोदरच म्हटले आहे की,
यावर्षीच्या शेवटपर्यंत सोने आपले मागील सर्व रेकॉर्ड तोडत 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा स्तर गाठू शकते.
अशावेळी छोट्या, मध्यम आणि मोठ्या कालावधीत सध्या किंमतीवर सोन्यात केलेली गुंतवणूक मोठा फायदा देऊ शकते.

Web Title :- Gold Price Today | earn money gold price decreased by rupees 2000 and silver cheaper by rs 5739 know how the trend would be ahead

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | तलवार हातात घेतलेले फोटो WhatsApp स्टेटसवर ठेवणं पडलं महागात, 2 सराईत गजाआड

Social News | या वर्षी साखरप्याची बाजारपेठ पुरात बुडाली नाही ! कोकणातील साखरप्याला गवसला पुरापासून मुक्तीचा मार्ग; जाणून घ्या