Gold Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात घसरण ! 10,000 रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आज सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी (दि.1) 22 कॅरेट सोन्याचा दर (22 Carat Gold Rate) 46 हजार 200 रुपयांवरुन कमी होऊन 45 हजार 740 रुपये प्रति तोळा झाला आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर (Gold price) रेकॉर्ड हायवर (Record High) 56 हजार 191 रुपये प्रति तोळावर पोहचले होते. त्या हिशोबाने आज सोनं (Gold price Today) 10 हजार रुपये स्वस्त दराने मिळत आहे. gold price today fall down by 10000 rs check latest rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

गुड रिटर्न्स (Good returns) वेबसाईट नुसार चांदीचे दर (Silver Rate Today) 67 हजार 600 रुपये प्रति किलो आहेत.
सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण झाल्याने सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या मते नवीन गुंतवणुकदारांना (new investors) सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये (Gold investment) एंट्री करण्याची ही चांगली संधी आहे.

 

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

देशातील मुख्य शहरामध्ये सोन्याचे दर (Gold price) आज घसरले आहेत.
नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर (Delhi 22 Carat Gold Price) 45 हजार 900 रुपये प्रति तोळा आहे.
तर चेन्नईमध्ये सोन्याच्या दरातील (Chennai 22 Carat Gold Price) घसरणीनंतर 44 हजार 100 रुपये प्रति तोळा इतका दर झाला आहे.
वेबसाईटच्या मते मुंबईत (Gold Rates in Mumbai) 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 740 रुपये आहे.

 

24 कॅरेट सोन्याचा दर (24 Carat Gold price)

24 कॅरेट सोन्याचा दर (24 Carat Gold price) गुरुवारी 47 हजार 200 रुपये प्रति तोळावरून घसरून 46 हजार 740 रुपये प्रति तोळा झाला आहे.
गुरुवारी चांदीचे दर (1kg Silver Price) 67 हजार 600 रुपये प्रति किलो आहेत.
बुधवारी चांदीचे दर 68 हजार रुपये प्रति किलोग्रॅम होते.

 

जूनमध्ये 2725 रुपयांनी सोने स्वस्त

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या (HDFC Securities) म्हणण्यानुसार, जून महिन्यात आतापर्यंत सोन्याचे दर (Gold price) 2725 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
तर चांदीचे दर (Silver Price) या कालावधीमध्ये 71 हजार 850 रुपये प्रति किलो वरून 68 हजार 148 रुपये प्रति किलो या स्तरावर पोहोचले आहेत.
जून महिन्यात चांदीचे दर 3700 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

Web Title : gold price today fall down by 10000 rs check latest rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharera | महारेराचा मोठा निर्णय ! ‘त्या’ बिल्डरांना बसणार चाप