Gold Price Today | 9000 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने, 2600 रुपयांनी घसरले चांदीचे दर, चेक करा 10 ग्रॅम गोल्डचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदी (Gold-Silver) खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे. कारण मागील काही दिवसात सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार होत आहे. गुड रिटर्न्सनुसार, आज शुक्रवारी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,410 रुपयांवरून कमी होऊन 47,350 रुपयांवर आली आहे. जर चांदीबाबत बोलायचे तर तिचा रेट 70,300 रुपये प्रति किलोग्रॅमवर आला आहे. अशाच प्रकारे 24 कॅरेट सोन्याचा भाव Gold Price Today शुक्रवारी 60 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीसह 48,350 रुपयांवर आला, जो मागील व्यवहाराच्या सत्रात 48,410 रुपये होता.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegramfacebook page and Twitter for every update

विक्रमी स्तरापेक्षा 9,000 रुपये स्वस्त आहे सोने
सोने खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे. कारण सोन्याचे दर अजूनही विक्रमी स्तरापेक्षा 9,000 रुपयांपर्यंत स्वस्त आहेत. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर होता.

प्रसिद्ध चितळे दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत ‘ब्लॅकमेल’; 20 लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी तिघांना अटक

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today, 18 June)
गुड रिटर्न्सनुसार, राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईत तो घसरून 45,150 रुपयांवर आला.
मुंबईत 10 ग्रॅम गोल्डचा रेट 47,350 रुपये आहे.
कोलकातामध्ये 47,180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा आजचा दर (Silver Price Today, 18 June)
आज चांदीच्या भावात सुद्धा जबरदस्त घसरण दिसून आली आहे.
शुक्रवारी चांदी 2600 रुपयांपर्यंत स्वस्त झाली. दिल्लीत 1 किलो चांदीचा भाव 67,700 आहे.
तर मुंबई, कोलकाता, चेन्नईमध्ये अनुक्रमे 67,700, 67,700 आणि 74,400 रुपये किलो आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegramfacebook page and Twitter for every update

Web title : gold price today fall down rupees 9000 from record high silver also drop 2600 check 10 gram gold rate samp

हे देखील वाचा

18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

Pune News | गावकर्‍यांना अंधारात ढकलून डीपीमधील 700 किलो तांब्याच्या तारा चोरणारे चोरटे अटकेत

नारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड?’