Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदी 1000 रुपयांनी ‘स्वस्त’ झाली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 28 जुलै 2021 ला सोन्याच्या भावात (Gold Price Today) घसरणीचा कल राहिला. तर, चांदीच्या किंमतीत आज 1000 रुपयांपेक्षा जास्त घट नोंदली गेली. यानंतर चांदी 65 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली गेली. मागील व्यवहराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,668 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद (Gold Price Today) झाले होते. तर, चांदी 65,873 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन-चांदीत तेजी नोंदली गेली.

सोन्याची नवीन किंमत

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या भावात केवळ 61 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट नोंदली गेली.
राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवीन भाव आज 46,607 रुपये प्रति
10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज किरकोळ प्रकारे
वाढून 1,800 डॉलर प्रति औंसवर पोहचली. फॉरेक्समध्ये आज रुपया डॉलरच्या तुलनेत 4 पैशाच्या
मजबूतीसह 74.43 च्या स्तरावर व्यवहार करत होता.

चांदीचा नवीन भाव

चांदीच्या किंमतीत आज ताबडतोब घसरण दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीचा दर 1,094 रुपयांच्या घटसह 64,779 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात उसळी नोंदली गेली आणि तो 24.76 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

सोन्याच्या किंमतीत का झाली घट

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, रुपयात मजबूती आणि कमोडिटी एक्सचेंजमध्ये किंमत घटल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट घाली.

हे देखील वाचा

Pune News | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

दररोज अंघोळ केल्यानं होऊ शकतं शरीराचं नुकसान, कधी-कधी स्नान केल्यामुळं होऊ शकतात ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Price Today fell to 46607 per 10 gram and silver dipped by rupees 1094 dollar ruppe on 28 july 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update