Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी 372 रुपयांनी झाली ‘स्वस्त’, खरेदीपूर्वी पहा नवीन भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफ बाजारात म्हणजे 3 ऑगस्ट 2021 ला सोन्याच्या भावात (Gold Price Today) घसरणीचा कल होता. यामुळे सोने आजसुद्धा 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली राहीले. तर, चांदीच्या किंमतीत (Silver) आज घट झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफ बाजारात सोने 46,922 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 66,444 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात आज गोल्डमध्ये घसरणीचा कल होता, तर चांदीच्या भावात मोठा बदल झाला नाही.

 

सोन्याचा नवीन दर

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात 31 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ घट झाली. यामुळे सोने 47 हजार रुपये प्रती 10 ग्रॅमच्या खाली कायम राहिले. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 46,891 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी होऊन 1,810 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

चांदीचा आजचा नवीन दर

चांदीच्या किंमतीत आजसुद्धा घसरण दिसून आली.
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचे दर 372 रुपयांच्या घटसह 66,072 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाले.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीत कोणताही खास बदल झाला नाही आणि ती 25.34 डॉलर प्रति औंसवर पोहचली.
या दरम्यान आज डॉलरच्या तुलनेत रूपया 4 पैशांनी मजबूत होऊन 74.30 च्या स्तरावर व्यवहार करत होता.
डॉलरच्या तुलनेत रुपयात तेजी आल्याने भारतीय बाजारात सोन्याची किंमत घटली आहे.

Web Tital : Gold price today fell to rupees 46891 per 10 gram and silver also drop down to rupees 66072 dollar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Jobs | अहमदनगर मनपा, सीमा सुरक्षा दल, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NTPC Recruitment 2021 | NTPC मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 71 हजार रुपये

University Grants Commission | भारतातील 24 विद्यापीठं बोगस ! UP प्रथम क्रमांकावर, महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश