लॉकडाऊन दरम्यान 4 दिवसानंतर आज सोनं झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलग ४ दिवसानंतर सोन्याचा दर सोमवारी घसरला असून पहिल्या सत्रात सोन्याच्या किंमतीत सुमारे १,३०० रुपये प्रति १० ग्रॅमने वाढ झाली होती. मे वायदा बाजारात चांदीचे दर वाढले असून सोमवारी चांदीचा दर ०.६६ टक्क्यांनी घसरून ४२,३३० रुपये प्रतिकिलोवर आला. अलीकडेच सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,३२७ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती. एमसीएक्सवर जूनच्या वायदा कारभारात सोन्याचा भाव ०.२२ टक्क्यांनी घसरून ४६,४२५ रुपये प्रति १० ग्रामवर आला आहे.

एका वर्षात ४० टक्के वाढला सोन्याचा भाव
भारतात गेल्या एका वर्षात सोन्याची किंमत ४०% पर्यंत वाढली असून याबद्दल संबंधित जाणकारांचे म्हणणे आहे की, गेल्या एका वर्षात भारतात सोन्याची किंमत खूपच आक्रमक झाली आहे. अनिश्चितता आणि पॅनिक वेळी सोन्याची कामगिरी चांगली असते. वास्तविक, कोणत्याही संकटाच्या भीतीने बहुतेक गुंतवणूकदार आपला धोका कमी करण्याचा विचार करतात.

काय आहे जागतिक बाजारपेठेची स्थिती?
जागतिक शेअर बाजारात किरकोळ वाढ झाल्यानंतर आज सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली असून आर्थिक मदत पॅकेजच्या मागणीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. जागतिक बाजारात सोन्याचा स्पॉट भाव ०.३ टक्क्यांनी घसरून १,७२२.४९ डॉलर प्रति औंस पातळीवर पोहोचला आहे. तर चांदीचा भाव १५.२४ डॉलर्स प्रति औंससह खालच्या स्तरावर राहिला आहे.

सर्वात मोठ्या ईटीएफ फंडाची होल्डिंग वाढली
कोरोना महामारीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थेला आता मंदीची भीती सतावत असून यामुळेच सुरक्षित म्हणून सोन्याच्या मागणीत तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी जगातील सर्वात मोठी गोल्ड बॅक्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंडाची होल्डिंग ०.६ टक्क्यांनी वाढून १,०४८.३१ टनवर पोहोचली. यापूर्वी गुरुवारी ती १,०४२.४६ टन पातळीवर होती.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणूक हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे. बँक ऑफ जपानद्वारे मदत पॅकेजची घोषणा करण्याच्या आशेने आशियाई बाजारपेठांमध्येही ठीकठाक व्यवसाय दिसून आला. तर अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये मात्र चांगली तेजी दिसून आली. अमेरिकेची राज्ये आता कोरोना व्हायरस प्रतिबंधाला टप्प्याटप्प्याने संपवण्याचा विचार करत आहेत.