Gold Rates : आज सोन्याच्या किमतीत होऊ शकते मोठी घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण लग्नाच्या सीजनमध्ये आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ब्रिटनमधील कोरोना लशीविषयीचा परिणाम आज भारतीय व विदेशी सराफा बाजारात दिसून येईल. आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदविली जाऊ शकते.

खरं तर, यूकेने फायजर आणि बायोएन्टेकची कोरोना लस वापरण्यास मान्यता दिली आहे. यासह कोरोना विषाणूच्या लशीच्या वापरास मान्यता देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना लशीच्या बातम्यांचा परिणाम आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सोन्याच्या बाजारावरही दिसून येईल.

म्हणूनच पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीची नोंद परदेशासह देशात होणार आहे. यापूर्वी बुधवारी देशात सोन्या चांदीच्या किमतीत काही प्रमाणात वाढ दिसून आली आहे. दिल्ली मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम 45 रुपयांनी वाढून 48,273 रुपये झाला, तर चांदी 407 रुपयांनी वाढून 59,380 रुपये प्रतिकिलो झाली.

यापूर्वी मंगळवारी 10 ग्रॅम सोन्याचे दर 44,228 रुपयांवर बंद झाले होते, तर चांदी 59,380 रुपये प्रतिकिलो होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रतिऔंस 1,812 डॉलर व चांदी प्रतिऔंस 23.34 डॉलरवर पोचली.

रुपयाच्या मजबुतीनंतरही जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या किमती सुधारल्यामुळे दिल्लीतील 24 कॅरेट स्पॉट गोल्डमध्ये 45 रुपयांची वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तथापि, कोरोना लसविषयी ब्रिटनकडून मिळालेल्या आनंदाच्या बातमीदरम्यान सोन्याची किंमत आज घसरणार आहे.

तज्ज्ञांच्या मते सोने ज्या प्रकारे घसरत आहे, असे दिसते की येत्या काही महिन्यांत सोन्याची किंमत 40 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. यावेळी आपण सोने खरेदी करण्याचीदेखील योजना आखत असाल तर थांबा आणि थोडी खरेदी करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

तज्ज्ञांच्या मते कोविड -19 साथीच्या लशीच्या प्रगतीविषयी वाढत्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदारांनी जोखमीच्या मालमत्तेत गुंतवणूक वाढवली. ज्यामुळे सोन्याच्या किमती खाली आल्या.