Gold Price Today : सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या 10 ग्रॅम Gold चा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसापासून देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर काही प्रमाणात कमी झाला होता. तर शनिवारी मात्र सोन्याच्या दरात उचांकी दिसून आली आहे. सोन्याचा भाव प्रति तोळा ५१० रुपायांनी वाढला आहे. म्हणजेच प्रति १०० ग्रॅम ५१०० रुपयांनी वाढले आहे. या सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने आता देशांतर्गत बाजारामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ४४ हजार ९०० रुपये इतका झाला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ४५ हजार ९०० रुपये झाला आहे. तसेच चांदीच्या किंमतीत देखील वाढ दिसून आलीय.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, सोन्याचा भाव शुक्रवारी प्रति तोळा ४४,२९० रुपये होता. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात अल्प प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मात्र गेल्या वर्षीची तुलना करता यंदा सोन्याचा दर कमी आहे.

महानगरातील सोन्याचा भाव (प्रति तोळा) –

दिल्ली –
२२ कॅरेट – ४५,९९० रुपये
२४ कॅरेट – ४९,९९० रुपये

मुंबई –
२२ कॅरेट- ४४,९०० रुपये
२४ कॅरेट – ४५,९०० रुपये

चेन्नई –
२२ कॅरेट – ४५,१०० रुपये
२४ कॅरेट – ४९,२०० रुपये

कोलकाता –
२२ कॅरेट – ४५,९९० रुपये
२४ कॅरेट – ४९,६४० रुपये

चांदीचे दर (किलोग्रॅम) –

दिल्ली –
७१,५०० रुपये.

मुंबई –
७१,५०० रुपये.

चेन्नई –
७६,१०० रुपये.

कोलकाता –
७१,५०० रुपये.

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
सोन्याची शुद्धता तपासून बघायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार केले आहे. BIS Care app द्वारे व्यक्ती सोन्याची शुद्धता तपासू शकणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून व्यक्ती फक्त सोन्याची शुद्धताच नाही तर त्याबाबत तक्रार सुद्धा करू शकणार आहे. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा सापडल्यास ग्राहक तात्काळ तक्रार करू शकणार आहे. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना तात्काळ तक्रार नोंदविण्याची माहिती देखील मिळणार आहे.