
Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोने आणि चांदीचा भाव घसरला; जाणून घ्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Price Today | कमॉडिटी बाजारात (Commodity Market) सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) उतरल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचा दर 80 रुपयांनी घसरला आहे. तर, चांदीचा भाव जवळपास पाचशे रुपयांनी घसरला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर (24 कॅरेट) 50,851 रुपये इतका झाला आहे. तसेच, 1 किलो चांदीचा दर 61,680 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.
ऑगस्ट 2020 साली सोन्याचा दर (Gold Price Today) 55,400 रुपयांवर गेला होता. त्यातुलनेत सोनं जवळपास 7 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. रिझर्व्ह बँकेकडून (RBI) आज (बुधवार) पतधोरण जाहीर केले आहे. यामध्येबँकेने रेपो दरात 0.50 टक्के वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आरबीआयचा रेपो दर 4.90 टक्के झाला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. तर दुसरीकडे भारतीय बाजारात (Indian Market) सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होताना दिसत आहे.
मुख्य शहरातील सोन्याचा दर –
दिल्ली –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये
चेन्नई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये
कोलकाता –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये
Web Title :- Gold Price Today | gold and silver price fall today 8th june 2022
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update