Gold Price Today | Gold 8487 नं स्वस्त ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | मागील आठवड्यात सततच्या तेजीनंतर चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने – चांदी दरात (Gold Price Today) मोठी घसरण पहायला मिळाली. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी एमसीएक्स मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं काहीशा घसरणीसह ट्रेड करत आहे. ऑगस्टमधील सोन्याचा वायदे भाव (Gold Price) 219 रुपयांच्या घसरणीसह 47 हजार 704 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. Gold Price Today | gold and silver price fall today on 12 july 2021 check todays gold rate in mumbai

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दरम्यान, सोन्या प्रमाणे चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. चांदीच्या दरामध्ये (Silver Price) 232 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीसह चांदी 69,065 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. ऑक्टोबर वायदे बाजारानुसार सोन्यात आज 188 रुपयांची घसरण झाली असून 47970 रुपयांच्या स्तरावर सोनं ट्रेड करत आहे.

सोनं 8487 रुपये स्वस्त

मागील वर्षी 2020 मध्ये याच कालावधीत MCX वर सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 56 हजार 191 रुपयांच्या उच्चांकी स्तरावर होता. आज सोन्याचा ऑगस्ट मधील वायदे भाव 47 हजार 704 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर आहे. म्हणजेच 2020 मधील उच्चांकी स्तरावरुन सोनं जवळपास 8487 रुपये स्वस्त झालं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले. 0.1 टक्के वाढ होऊन सोनं 1,809.34 डॉलर प्रति औंस आहे. अमेरिकी सोने वायदे भाव 0.1 टक्के घसरणीसह 1,809.3 डॉलरवर बंद झाला. तर चांदी 0.6 टक्के वाढीसह 26.23 डॉलर प्रति औंस आहे.

प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर

राजधानी दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याच (24 carat gold) दर 50950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तर कोलकातामध्ये 50,070, लखनऊ 50,950, मुंबई 47,810 आणि चेन्नईमध्ये 49,160 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Gold Price Today | gold and silver price fall today on 12 july 2021 check todays gold rate in mumbai

हे देखील वाचा

 

Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

Retirement च्या नंतरसुद्धा EPF खात्यावर मिळू शकते व्याज ! ते सुद्धा विना कॉन्ट्रीब्यूशन,
जाणून घ्या कधी आणि कसे?

Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका, बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

MP Sudhir Gupta on Amir Khan | आमिर खानवर BJP खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य,
म्हणाले – ‘आजोबाच्या वयात तिसरी पत्नी शोधतोय, हा अंडी विकण्याच्या लायक’