Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत काहीशी वाढ; जाणुन घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Gold Price Today | बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Price Today) सातत्याने बदल होताना पाहायला मिळते. मागील काही दिवसापासुन सोन्याच्या दरात घट झाली. मागील दोन दिवसापुर्वी देखील मोठी घसरण झालेलं पाहायला मिळालं. आज मात्र सोन्याच्या किंमतीत काहीशी वाढ झाली आहे. शुक्रवारी सोन्याचा प्रति तोळा भाव 47,070 रुपये इतका होता. आज (शनिवारी) सोन्याच्या भावात 10 रुपायाची वाढ होऊन दर 47,080 रुपये पर्यंत पोहचला आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजनुसार (Multi Commodity Exchange) आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याची किंमत (Gold Price) 47,451 रुपये होती.
तसेच अखेरपर्यंंत 46,793 रुपयांपर्यत पोहचला आहे. यावरुन सोनं 500 रुपयांनी स्वस्त मिळतं आहे.
आज (शनिवारी) सोन्याच्या दरात बदल झाला असला तरी चांदीच्या दरात (silver price) कोणताही बदल झालेला दिसला नाही.
चांदीच्या भावात दरात 0.05 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा भाव (silver price) 64,150 रुपये पर्यंत स्थिर आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने (Union Ministry of Finance) एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता.
या निर्णयाची आता भारतातील सराफा व्यापाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाणार आहे.
यावरुन आता सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांची खरेदी रोख पैसे देऊन करायची असल्यास तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्ड (Aadhaar card and PAN card) दाखवणे बंधनकारक राहील. नाहीतर देशातील कोणत्याही ज्वेलर्समध्ये तुम्हाला सोने खरेदी करता येणार नाही.
या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करु लागले आहेत.
तसेच 2 लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे.

 

सोन्याचा भाव दुप्पट होणार?

आगामी काही वर्षामध्ये सोन्याचा दर (Gold Price) गगणाला भिडणार असल्याचा अंदाज अनेक जाणकराकंडून वर्तवण्यात येत आहे.
एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मतानुसार आगामी 3 ते 5 वर्षांत सोन्याचा भाव आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो.
आगामी 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 90 हजारांवर जाऊन पोहोचेल.
असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) दिले आहे.

 

Web Title : Gold Price Today | gold and silver price today in market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | फडणवीसांचा सरकारला सवाल; म्हणाले – ‘कलम १४४ फक्त गणेशभक्तांसाठीच का?’

Nagpur News | दुर्देवी ! मैदानात सराव करणाऱ्या खेळाडूंच्या अंगावर वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

Mansukh Hiren Murder Case | मनसूखची हत्या झाल्यानंतर प्रदिप शर्मांना फोन लावला अणि तिकडून केवळ ओके उत्तर आलं, NIA चार्जशीटमध्ये नोंद