Gold Price Today | सोनं खरेदीची हीच सुवर्णसंधी ! आज पुन्हा सोन्याचा दर घसरला; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  मागील सलग तीन दिवसापासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. आजही (गुरुवारी) 26 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा दर कमी आहे. सध्या सोन्याचा भाव 46 हजारांपेक्षा जास्त आहे. याचबरोबर चांदीच्या दरात (Silver Price) देखील घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर उतरले आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात देखील आज सोन्याचा भाव घटला आहे. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत 46,414 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीचा दर 61,976 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे.

आजचा सोन्याचा भाव 

दिल्लीतील सराफा बाजारात आज (गुरुवारी) 26 ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव (Gold Price) प्रति तोळा 265 रुपयांची घसरण झालीय.
आजच्या घसरणीनंतरही सोन्याचा भाव प्रति तोळा 46 हजारांपेक्षा अधिक आहेत.
या घसरणीनंतर दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 46,149 रुपये प्रति तोळावर पोहचला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यानंतर दर 1,785 डॉलर प्रति औंसवर आहे.

आजचा चांदीचा भाव – (Silver Price Today)

चांदीच्या दरात (Silver Price) आज (गुरुवारी) घसरण झाली आहे.
आज चांदीच्या दरात 323 रुपयाची घसरण झाली आहे.
यामुळे चांदीचा भाव 61,653 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे.
तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव किरकोळ कमी झाले आहेत.
या घसरणीनंतर चांदी 23.65 डॉलर प्रति औंसवर आहे.

 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव खाली-वर होत आहेत.
न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंजवर स्पॉट गोल्डची किंमत उतरली आहे.
तर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारले आहे.
फॉरेक्स मार्केटमध्ये रुपयाने आज 13 पैशांच्या मजबुतीसह 74.11 च्या स्तरावर व्यवहाराची सुरुवात केली होती.
यामुळे देखील सोन्याच्या दरावर दबाव वाढला होता.
असं एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (Commodities) तपन पटेल यांनी सांगितलं आहे.

 

Web Title : Gold Price Today | gold and silver price today on 26th august 2021 check details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anil Deshmukh Case | अखेर राज्य सरकार सीबीआयला देणार संबंधित आवश्यक कागदपत्रे

Earn Money | कमाईची गोष्ट ! दूध, तूप, लोणी विकून महिन्याला होऊ शकतं 3 लाखाचं ‘इन्कम’, ‘ही’ कंपनी देतेय संधी; जाणून घ्या

Yahoo News | Yahoo च्या न्यूज वेबसाइट्स आता भारतात करणार नाहीत काम, जाणून घ्या तुमच्या याहू अकाऊंटचे काय होणार