Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणुन घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सोने आणि चांदीच्या दरात (Gold Price Today) सातत्याने बदल होत असतात. मागील दोन आठवड्यापुर्वी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. त्यानंतर पुन्हा सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. त्यानंतर आज (गुरुवारी) सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीत (silver) देखील घट झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजनुसार (Multi Commodity Exchange) ऑक्टोबर वायदा 130 रुपये म्हणजेच 0.28 टक्क्यांच्या घसरणीनंतर सोन्याचा दर (Gold Price) 46,908 रुपये पर्यंत पोहचला आहे. तसेच 0.40 टक्के घसरणीनंतर चांदीचा भाव 63,926 रुपयांवर स्थिर आहे.

डॉलरमध्ये आलेली मजबूती आणि अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नामुळे जागतिक आर्थिक वाढीच्या चिंतेमुळे सराफा बाजारात परिणाम पाहायला मिळत आहे. जागतिक स्तरावर सोन्याचा भाव (Gold Price) आज (गुरुवारी) 2 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. दरम्यान आजच्या घसरणीच्या तुलनेत सोनं आपल्या सर्वोच्च स्तराच्या तुलनेत 9,300 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे. ऑगष्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव (Gold Price) 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत होता. या तुलनेत आज सोनं स्वस्त मिळत आहे.

WhatsApp मध्ये येणार ‘हे’ 6 धमाकेदार फीचर्स, बदलून जाईल वापरण्याची स्टाईल; जाणून घ्या

Missed Call द्वारे जाणून घ्या सोन्याचा भाव –

सोन्या-चांदीचा दर (Gold and silver price) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

अशी तपासा सोन्याची शुद्धता –

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. ‘BIS Care app’ असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात.

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,120 रुपये

दिल्ली –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,250 रुपये

चेन्नई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,520 रुपये

कोलकाता –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,650 रुपये

हे देखील वाचा

Pune Crime | ‘बाळूमामा’ यांचा अवतार असल्याचा बनाव करून लाखोंची फसवणूक ! मनोहर मामा भोसले यांच्यासह तिघांवर अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा आणि इतर कलमानुसार पहिला गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Sangli Anti Corruption | आरोपी न करण्यासाठी 25 हजारांची लाच घेणारा सहायक पोलीस निरीक्षक ACB च्या जाळ्यात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Price Today | gold and silver rate fall down check todays 9 september 2021 latest gold rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update