Gold Price Today | सोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर ! सोने सर्वोच्च स्तरापासून 9512 रुपये स्वस्त

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 30 डिसेंबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण दिसून आली. तर, चांदीच्या किमतीत (Silver) सुद्धा आज घट नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात अवघी 98 रुपयांची घट झाली. तर, चांदीच्या किमतीत आज 699 रुपयांची घसरण झाली.

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोने 98 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या किरकोळ घसरणीसह 46,688 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,786 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

सोने 9512 रुपयांनी स्वस्त मिळतेय

सोने सध्या आपल्या सर्वोच्च स्तरापासून 9512 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020 मध्ये गाठला होता. त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर गेले होते.

चांदीचा आजचा दर (Silver price Today)

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी चांदीच्या दरात 699 रुपयांच्या घसरणीनंतर 60,024 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली.
मागील व्यवहाराच्या सत्रात चांदी 60,723 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.

Web Title : Gold Price Today | gold declines rs 98 silver tumbles rs 699 check latest sona ka bhav 30 december 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

 

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात