खुशखबर ! परदेशी बाजारात आज सोनं झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या भारतामध्ये किती होणार ‘घट’

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमती पुन्हा उतरल्या आहेत. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे परकीय बाजारात सोने खरेदी स्वस्त झाली आहे. बुधवारी सोन्याच्या किंमती प्रति औंस 2000 डॉलर खाली आल्या आहेत. या सिग्नलमुळे भारतीय बाजारात बुधवारी सोन्या-चांदीच्या किंमती उतरल्या. एमसीएक्सवरील ऑक्टोबरच्या सोन्याचे वायदे 0.5 टक्क्यांनी घसरून 53,313 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तसेच, चांदीचा वायदा 0.8% घसरून 68,938 प्रती किलोग्रॅम झाला. गेल्या दोन सत्रात सोन्याच्या किंमती प्रति दहा ग्रॅम 1,300 रुपयांनी वधारल्या होत्या, तर चांदी प्रति किलोग्रॅममागे 2,100 रुपयांनी वाढली होती.

आता काय होईल- या संकेतामुळे आज देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या किंमती घसरू शकतात. यापूर्वी मंगळवारी दिल्ली सराफा बाजारपेठेतील 99.9 टक्के शुद्धतेचे सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम, 53,674 रुपये वरुन, 54,856 रुपये प्रति 10 ग्राम झाले होते, त्या दरम्यान प्रति दहा ग्रॅमला किंमतीत 1,182 रुपयांची तेजी आली होती. त्याचबरोबर मुंबईतील 99.9 टक्के सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 53894 रुपयांवर गेली होती.

कोटक सिक्युरिटीजने एका नोटमध्ये म्हटले आहे की सोन्यातील अस्थिरता खूपच जास्त आहे आणि ती अजूनही सुरूच राहिल. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या मिनिटांकडे गुंतवणूकदारांचे डोळे निश्चितच लागले आहेत. फेडचे मिनिटे बुधवारी उशिरा सांगितले जातील.

सोन्याचे भाव कसे व कोण ठरवतात- तज्ज्ञ सांगतात की जेव्हा बाजारात महागाई वाढते, तेव्हा सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि महागाई कमी झाल्यास सोन्याची मागणीही कमी होते. अशा परिस्थितीत महागाई वाढण्याचा आणि घटण्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवरही होतो.

देशांच्या मध्यवर्ती बँका सोने राखीव ठेवतात. जेव्हा जेव्हा केंद्रीय बँका असे करतात तेव्हा सोन्याच्या किंमतीत वाढ होते. असे यासाठी घडते कि या परिस्थितीत बाजारात चलनाचा प्रवाह वाढतो आणि सोन्याचा सप्लाई कमी होते.

जागतिक चळवळीतील कोणत्याही बदलाचा परिणाम भारतातील सोन्याच्या किंमतीवरही होतो. कारण भारत हा सोन्याची सर्वात जास्त आयात करणारा देश आहे. अशा परिस्थितीत जेव्हा निर्यात करणारे देश कोणत्याही जागतिक हालचालीमुळे सोन्यावरील आयात शुल्क वाढवतात तेव्हा त्याचा परिणाम भारतात अजूनही दिसून येतो आणि सोने महाग होते.

आर्थिक उत्पादने आणि सेवांसाठीचे व्याज दर सोन्याच्या मागणीशी थेट संबंधित आहेत. सध्याच्या सोन्याच्या किंमती कोणत्याही देशातील व्याज दरासाठी विश्वसनीय सिग्नल मानल्या जातात. व्याजदरात घट झाल्यामुळे ग्राहक रोखऐवजी सोन्याची विक्री करण्यास सुरुवात करतात आणि यामुळे सोन्याची सप्लाई वाढत जाते आणि मग त्याची किंमत कमी होते. त्याचप्रमाणे जेव्हा इंट्रेस्ट रेट्स कमी असतात तेव्हा सोन्याची मागणी वाढते आणि त्याची किंमतही वाढते.

भारतात सणांच्या वेळी दागदागिने खरेदी करणे हे एखाद्या धार्मिक कार्यासारखे आहे. अशा परिस्थितीत दिवाळी आणि धनतेरस या सणांच्या काळात देशात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत किंमत वाढ देखील निश्चित केली जाते. याशिवाय सोन्याच्या उत्पादनात होणारा खर्चदेखील त्याची किंमत निश्चित करतो. या सर्वांखेरीज सोन्याची किंमत ठरविण्यामध्ये मागणी व पुरवठा ही सर्वात मोठी भूमिका बजावते.