Gold Price Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण तर चांदी तेजीत, जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे चांदीच्या दरात (Silver Rate) वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज सोन्याचे दर (Gold Price Today) कमी झाले आहेत. MCX वर सोन्याचे वायदे भाव 27 रुपयांनी कमी होऊन 51 हजार 420 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहेत. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात 3500 रुपयांची घसरण झाली आहे.

 

आज चांदीच्या किमतीत वाढ (Silver Price Today) झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंवर (MCX) सकाळी चांदीचा वायदे भाव 174 रुपयांनी वाढून 68 हजार 050 रुपये प्रति किलोग्रॅम वर पोहोचला. मागील आठवड्यात चांदीचा भाव अनेक दिवसानंतर 68 हजाराहून खाली आला होता. मात्र, आता पुन्हा तो 68 हजारांवर पोहचला आहे.

 

जाणकारांच्या माहितीनुसार, क्रूडच्या (Crude) दरात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने (International Energy Agency) पुढील महिन्यापासून रशियातून (Russia) 30 लाख बॅरल तेल बाजारात येणं बंद होईल. या घोषणेनंतर क्रूड किमतीत 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. क्रूड ऑइल (Crude Oil) महाग झाल्याने पुन्हा एकदा सोन्याची मागणी वाढेल आणि सोने दरात मोठी वाढ होऊ शकते.

 

रशिया आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध (War) निवळलं असताना सोने दरात घसरण झाली.
रशियाकडेही सोन्याचा मोठा साठा असून तो जागतिक बाजारपेठते (Global Markets) विक्री करायचा आहे.
हे सोने बाजारात आल्यास त्याचा पुरवठा वाढेल आणि भावात मोठी घसरण होऊ शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर
सोन्या – चांदीचा दर (Gold Price Today) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात.
8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल.
या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

 

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.
जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

 

Web Title :- Gold Price Today | gold fall today on 21 march 2022 silver rate hike check latest gold silver price

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा