
Gold Price Today | सोने आणि चांदीत मोठी घसरण, खरेदीपूर्वी ताबडतोब जाणून घ्या नवीन दर
नवी दिल्ली : Gold Price Today | तुम्हाला सोने किंवा चांदी (Gold-Silver) खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, गुरुवारी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. दहा ग्रॅम सोने स्वस्त होऊन 49,830 रुपये झाले आहे. एक किलो चांदीचा दरही खाली आला असून आता ती 54,351 रुपयांना विकली जात आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) ने ही माहिती दिली आहे. (Gold Price Today)
सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 478 रुपयांनी घसरून 49,830 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील ट्रेडिंग सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 50,308 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
चांदीचा आजचा भाव (Silver Price Today)
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 1,265 रुपयांनी घसरल्यानंतर 54,351 रुपये प्रति किलोवर बंद झाला. मागील ट्रेडिंग सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदी 55,616 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
सोन्याचा नवीन भाव कसा जाणून घ्यावा
सोन्याचा ताजा दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.
सोन्यावरील आयात शुल्क वाढले
केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात (Gold Import Duty Hike) 5 टक्के वाढ केली आहे.
आयात शुल्क 7.5% वरून 12.5% करण्यात आले आहे. आयात शुल्कात वाढ केल्याने देशातील सोन्याच्या किमती वाढू शकतात,
असे सरकारला वाटत आहे. देशातील सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
Web Title :- Gold Price Today | gold falls rs 478 silver tumbles rs 1265 check latest rate
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- CM Eknath Shinde | ‘बंडखोर गद्दार’ शब्दावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘त्यांना काय…’
- Ganeshotsav 2022 | बाप्पा पावला ! गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या निर्बंधाबाबत शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा दिलासादायक निर्णय
- Nilesh Rane | ‘उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते, जे ठाकरे सरकारच्या नादाला लागले ते…’ – निलेश राणे