Gold Price Today : खुशखबर ! अनेक सत्रातील तेजीनंतर घसरला सोन्याचा भाव, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सराफा बाजारात अनेक दिवसाच्या तेजीनंतर आज म्हणजे 25 मे रोजी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली. यानंतर सुद्धा सोने 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर कायम आहे. तर, चांदीची किंमत सुद्धा आज घटली आहे. आज चांदी 71,000 रुपये प्रति किग्रॅच्या खालीच होती. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 48,127 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 71,079 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. भारतीय बाजारांच्या उलट अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या हाजिर भावात तेजी नोंदली गेली, तर चांदीच्या किंमतीत बदल झाला नाही.

सोन्याचे नवीन दर
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात 102 रुपये प्रति 10 ग्रॅमची किंचित घसरण झाली. यानंतर सोने 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर कायम होते. राजधानी दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव आता वाढून 48,025 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. यापूर्वीच्या व्यवहाराच्या सत्रात सोने 48,127 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा हाजिर भाव उसळी घेत 1,882.50 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

चांदीचे नवीन दर
चांदीच्या किंमतीत आज घसरणीचा कल होता. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा दर 269 रुपयांनी कमी होऊन 70,810 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. यापूर्वी व्यवहाराच्या सत्रात चांदी 71,079 रुपये प्रति किग्रॅ पर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या भावात विेशेष बदल झाला नाही आणि ती 27.67 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

सोन्या-चांदीत का झाली घसरण
एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, डॉलरच्या तुलनेत रुपयात आलेल्या मजबूतीमुळे सोन्याच्या किमती भारतीय बाजारात कमी झाल्या. त्यांनी सांगितले की, सुरुवातीच्या व्यवहारात रुपया डॉलरच्या तुलनेत 13 पैसे मजबूत होऊन 72.83 च्या स्तरावर व्यवहार करत होता.