Gold Price Today : सोन्याच्या वायदा भावात लक्षणीय घसरण, चांदीही घसरली, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी देशी वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झालेली पहायला मिळाली. सोमवारी सकाळी 10.20 वाजता एमसीएक्स एक्सचेंजवर डिसेंबर वायदा सोन्याचा दर 1.02 टक्क्यांनी किंवा 514 रुपयांनी घसरून 50,056 रुपयांवर पोहोचले. तसेच सोमवारी सकाळी सोन्याचा जागतिक वायदा व स्पॉट किंमतीमध्येही घसरण झालेली पहायला मिळाली.

सोन्याबरोबरच चांदीच्या देशांतर्गत वायद्याच्या भावातही सोमवारी लक्षणीय घट झालेली पहायला मिळाली. सोमवारी सकाळी 10.30 वाजता एमसीएक्स एक्सचेंजमधील डिसेंबर वायदा चांदीचा दर प्रति किलो 1.16 टक्क्यांनी कमी होऊन 709 रुपयांच्या घसरणीसह 60,436 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होता. जागतिक पातळीवर चांदीच्या वायद्याच्या दरात सोमवारी सकाळी घसरण झालेली पहायला मिळाली.

जागतिक सोन्याचा भाव
सोन्याच्या जागतिक किंमतीबद्दल बोलायचे म्हणले तर सोमवारी सकाळी त्यामध्ये घट झालेली पहायला मिळाली. ब्लूमबर्गच्या मते सोमवारी सकाळी सोन्याचा जागतिक वायदा दर 0.54 टक्क्यांनी किंवा 10.30 डॉलर घसरुन प्रति औंस 1,0797.30 डॉलरवर बंद झाले. त्याशिवाय सोन्याची जागतिक किंमत सध्या औंस 1,533.24 डॉलर प्रति औंस म्हणजे 0.35 टक्क्यांनी किंवा 6.60 डॉलर खाली आली आहे.

जागतिक सोन्याचा भाव
सोमवारी सकाळी चांदीचा जागतिक वायदा भाव घसरला आणि स्पॉटमध्ये वाढ झालेली दिसून आली. ब्लूमबर्गच्या मते सोमवारी सकाळी चांदीचा जागतिक बाजारभाव 0.50 टक्क्यांनी किंवा 0.12 डॉलरने घसरून 23.91 डॉलर प्रति औंस झाला. त्याचबरोबर सध्या चांदीचा जागतिक भाव 0.28 टक्के म्हणजेच 0.07 डॉलर प्रति औंसची तेजीसह 23.80 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसले.