Gold Price Today | सोन्यात 47 रुपयांची तेजी, चांदीत 496 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्याने शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या (Gold) दरात 47 रुपयांची वाढ झाली. त्याचवेळी आज चांदीचा भाव 496 रुपयांनी वाढला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) ने ही माहिती दिली. (Gold Price Today)

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 47 रुपये प्रति 10 ग्रॅमनी वाढून 50,729 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 50,682 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. (Gold Price Today)

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)

दिल्ली सराफा बाजारात चांदी 496 रुपयांनी वाढून 53,429 रुपये प्रति किलोवर पोहोचली. मागील व्यवहाराच्या सत्रात चांदीचा भाव 52,933 रुपये प्रति किलो होता.

एचडीएफसीचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्स्चेंज, कॉमेक्स येथे सोन्याचा हाजीर भाव 0.42 टक्के तेजीसह 1,702 डॉलर प्रति औंस होती, त्यामुळे येथेही भाव मजबूत राहीले.

 

Web Title : –  Gold Price Today | gold gains rs 47 silver jumps rs 496 check latest

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा