Gold Price Today | सोने झाले महाग, तर कमी झाले चांदीचे दर, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात आज बदल झाला आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली असतानाच, चांदी मात्र स्वस्त झाली आहे. शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात थोडीशी वाढ नोंदली गेली आहे. दहा ग्रॅम सोने महाग होऊन 50,613 रुपये झाले आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीच्या दरात घसरण झाली असून ती आता 56,540 रुपयांना विकली जात आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. (Gold Price Today)

 

सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 97 रुपयांनी वाढून 50,613 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा भाव 50,516 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

 

चांदीचा आजचा भाव (Silver Rate Today)
चांदीचा भाव 303 रुपयांनी घसरून 56,540 रुपये किलो झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात चांदी 56,843 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,742 डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव 19.20 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आणि यूएस बॉन्ड उत्पन्नातील घट यामुळे सोन्याच्या किमतीतील घसरण थांबली.

 

सोन्यावरील आयात शुल्क वाढले
केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात (Gold Import Duty Hike) पाच टक्के वाढ केली आहे.
आयात शुल्क 7.5% वरून 12.5% करण्यात आले आहे.
सरकारने आयात शुल्क वाढवल्याने देशातील सोन्याच्या किमती वाढतील.
देशातील सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

 

Web Title :- Gold Price Today | gold gains rs 97 silver falls rs 303 check gold silver 8 july 2022 latest rates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepali Sayed | ‘मेलेल्या आईचं दूध पिऊन सत्तेत गेलात का ?’ – दीपाली सय्यद

 

Ajit Pawar | अजित पवार यांच्या उपस्थितीत 10 जुलैला गुरुजन गौरव सोहळा

 

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा, म्हणाले – ‘…अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही’