Gold Price Today | सोने झाले महाग, चांदीची चमक सुद्धा वाढली; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा (Gold) भाव 594 रुपयांनी वाढला. तर चांदीच्या (Silver) दरात आज 998 रुपयांची वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) ने ही माहिती दिली आहे. (Gold Price Today)

 

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 594 रुपयांनी वाढून 50,341 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 49,747 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. (Gold Price Today)

 

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 998 रुपयांनी वाढून 55,164 रुपये प्रति किलोवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदी 54,166 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

 

असा जाणून घ्या सोन्याचा दर
तुम्ही सोन्याचा दर घरबसल्या जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल
आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.

 

सोन्यावरील आयात शुल्क वाढले
केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्के वाढ (Gold Import Duty Hike) केली आहे.
आयात शुल्क 7.5% वरून 12.5% करण्यात आले आहे.
सरकारने आयात शुल्क वाढवल्याने देशातील सोन्याच्या किमती वाढतील असा अंदाज आहे.
देशातील सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

 

Web Title :-  Gold Price Today | gold jumps rs 594 silver rallies rs 998 check latest sona ka bhav 22 july 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Election 2022 | 29 जुलैला महिला आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत, इच्छुक पुन्हा गॅसवर 

 

Top 5 Multibagger Penny Stocks | 5 रुपयांपेक्षा सुद्धा कमी होती ‘या’ 5 शेअरची किंमत, यावर्षी आतापर्यंत दिला आहे जबरदस्त रिटर्न

 

MP Shreerang Barne | मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितला, शिवसेनेने…; खा. श्रीरंग बारणेंनी सांगितलं शिंदे गटात जाण्याचे कारण