Gold Price Today | सलग 5 दिवसांपासून घसरतोय सोन्याचा दर, विक्रमी दरापेक्षा एवढ्या किमतीने सोने स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) लागोपाठ झालेल्या घसरणीनंतर बाजारात सोन्याच्या मागणीत तेजी आहे. कोरोना (Corona) काळात अनेक दिवसांपर्यंत बाजारात आलेल्या मंदीनंतर पुन्हा एकदा लोकांकडून सोन्याच्या (Gold Price Today) मागणीत वाढ दिसून येत आहे.

 

मागील 5 दिवसात इतके घसरले सोने

देशाच्या राजधानीत बुधवारी सोन्याच्या दरात (Gold Price Today) मोठी घसरण झाली. बुधवारी बाजार खुला होण्यापूर्वी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर (22 carat gold Price) 47,410 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. ज्यानंतर सोन्याच्या दरात 410 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण दिसून आली. सोन्याच्या दरात झालेल्या या मोठ्या घसरणीनंतर बाजारात सोन्याचा दर 47,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. यापूर्वी मंगळवारी सुद्धा सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली होती.

 

मंगळवारी बाजार उघडण्यापूर्वी दिल्लीत सोन्याचा दर 47,640 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. यानंतर सोन्याच्या दरात 230 रुपये प्रति दहा ग्रॅम घसरण दिसून आली. ज्यानंतर सोन्याच्या दरात 47,410 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. मागील शनिवारपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मागील 5 दिवसात सोने 720 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत घसरले आहे.

 

सोन्याच्या दरात 8,400 रुपयांची घसरण

सोन्याच्या दरात बुधवारी झालेल्या घसरणीनंतर सोने आपल्या ऑल टाइम हाय रेट पासून (All time high rate) 8,400 रुपये प्रति दहा ग्रॅम स्वस्त झाले आहे.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये सोने विक्रमी 55,400 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचले होते.
जर आपण सोन्याच्या सध्याच्या दराची तुलना केली तर सोने 8,400 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त झाल्याचे दिसून येते.

 

Web Title :- Gold Price Today | gold price decreasing from 5 consecutive days know gold rate in india delhi ncr

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा