Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

0
432
Gold Price Today gold price silver rate latest gold rate today 16 august
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय सराफा बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण (Gold Price Today) झाली आहे. तर चांदीच्या दरात तेजी पहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर विक्रमी दरापेक्षा (Gold Price Today) 4 हजार 232 रुपयांनी स्वस्त आहे. आज सोने 51 हजार 968 रुपये तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदी (Silver Price) 57 हजार 380 रुपये झाली आहे.

 

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (Indian Bullion Jewelers Association) वेबसाईटनुसार, आज सोन्याचा दर (Gold Price Today) प्रति दहा ग्रॅम 51 हजार 968 रुपये आहे. सोन्याचे दर शेवटच्या ट्रेडिंग दिवशी 52 हजार 019 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 51 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे.

 

उच्चांकी किंमतीपेक्षा सोनं स्वस्त

सोने आजही त्याच्या आजपर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4 हजार 232 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

 

चांदीच्या दरात वाढ

आज चांदीचा दर 57 हजार 380 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 57 हजार 362 रुपये प्रति किलो दराने बंद झाला होता. त्यामुळे आज चांदीचा दर 18 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

 

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

 

या ठिकाणी करा तक्रार

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप तयार केले आहे.
BIS Care APP द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.
या अ‍ॅपद्वारे केवळ सोन्याची शुद्धता नाही तर त्याबाबत कोणतीही तक्रार करु शकता.
या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्यासंदर्भात तात्काळ तक्रार करु शकतात.

 

Web Title : – Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा