Gold Price Today | आजही सोन्याच्या दरात घसरण; जाणुन घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Price Today) सातत्याने चढ-उतार होत असतो. मागील काही दिवसापासून सोन्याच्या भावात घसरण होताना पाहायला मिळत आहे. आज (मंगळवार) देखील सोने आणि चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) वर सोने वायदे किंमतीत 4 दिवसांत तिसऱ्यांदा घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज सोन्याच्या दरात 0.1 टक्क्यांनी घट होऊन भाव 46,860 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. तर, चांदी (Silver) 0.23 टक्क्यांनी घसरण होऊन 63,155 रुपये प्रति किलोग्रॅम वर स्थिर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या किंमतीत (Gold price today) घसरण पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने दरात घसरणीचं कारण डॉलर आहे. 4 दिवसांत तिसऱ्यांदा घसरण झाली आहे. दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार केला आहे. ‘BIS Care app’ असं या App चं नाव असून ग्राहक या माध्यमातुन सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.

 

केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या दर –

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलच्या माध्यमातुन जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल. दरम्यान, MCX वर ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50 हजार रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

काय आहे 24 कॅरेट सोन्याचा दर?

मुंबई –
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,000 रुपये

दिल्ली –
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,340 रुपये

कोलकाता –
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

चेन्नई –
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,380 रुपये

Web Titel :- Gold Price Today | gold price fall third time in four days check today 14 september 2021 latest gold silver rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करीत ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

RBI | PMC आणि गुरु राघवेंद्र सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! नोव्हेंबरपर्यंत मिळणार पैसे , RBI देणार 10 हजार कोटी

Pune Police | पुण्यातील कोंढव्यात वाहतूक पोलिस निखिल नागवडेंनी केलं ‘हे’ काम, होतंय ‘कौतुक’ (व्हिडिओ)