Gold Price Today | सणासुदीच्या काळात वाढला सोन्याचा दर, तरीसुद्धा मिळतेय 9894 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सणासुदीच्या काळात (Festive Season) भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 18 ऑक्टोबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) किरकोळ तेजीचा कल होता. तरीही सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून खुप कमी किमतीत विकले जात आहे. तर, चांदीच्या दरात (Silver) सुद्धा आज उसळी नोंदली गेली आहे आणि तो 62 हजार रुपये प्रति किग्रॅच्या वर पोहचला.

 

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,269 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर, चांदी 62,005 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली हाती. भारतीय सराफा बाजाराच्या उलट आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दर कमी झाला, तर चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही. (Gold Price Today)

 

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात अवघी 37 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी नोंदली गेली. यामुळे दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,206 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला.

 

सोने अजूनही स्वस्तच
मात्र, अजूनही सोन्यात गुंतवणुकीची संधी आहे. कारण त्याचा सध्याचा दर सर्वोच्च स्तराच्या तुलनेत खुप खाली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर गाठला होता. या दृष्टीने सध्या सोने तेव्हा पासून सुमारे 9,894 रुपये स्वस्त मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण नोंगदली गेली आणि ते 1,766 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)
चांदीच्या दरात आज वाढ दिसून आली.
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 323 रुपयांच्या तेजीसह 62,328 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि तो 23.36 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

 

महागाईच्या चिंतेमुळे सोन्यात तेजी
एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Security) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की,
मजबूत डॉलर आणि जागतिक बाजरातून मिळालेल्या संकेतांमुळे सोने जास्त किमतीवर व्यवहार करत आहे.
तसेच, महागाईच्या चिंतेमुळे सुद्धा सोन्यात तेजी नोंदली गेली आहे.

 

Web Title :- Gold Price Today | gold price gains today but still 9894 rupees lower then record high check update gold rates of 10 gram

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सावधान ! WhatsApp यूजर्स Hackers च्या जाळ्यात, आता असे लूटत आहेत पैसा, जाणून घ्या बचावाची पद्धत

Small Saving Scheme | पैशांची असेल गरज तर ‘या’ 2 बचत योजनांवर मिळते चांगले कर्ज; जाणून घ्या व्याजदर

Pune News | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांची फर्स्ट एड पॉलिक्लिनिकला भेट; लहू बालवडकर यांच्या कामाचे केले कौतुक